इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:खा. प्रीतम मुंडे च्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन केले सन्मानित!

 बीड पोलिस प्रशासनाच्या वतीने पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांचा झाला सन्मान!



खा. प्रीतम मुंडे च्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन केले सन्मानित!


बीड:-


बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमिताने "सन्मान कर्तृत्वाचा"  हा कार्यक्रम बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला 

यावेळी टाईम्स नाऊ न्युज चॅनेल च्या बीड जिल्हा प्रतिनिधी पत्रकार सुकेशनी नाईकवाडे याना त्यांनी सेवाभावी वृत्तीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्धल बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, यावेळी सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

बीड जिल्ह्यात मागच्या 9 वर्ष्यापासून मी खासदार म्हणून  काम करत असताना  इलेक्ट्रॉनिक मेडियाच्या माध्यमातून  निर्भीड पणे पत्रकारीता करणारी महिला  पत्रकार सुकेशनी नाईकवाडे सोडता मी दुसरी पत्रकार पहिली नाही. पत्रकार क्षेत्र हे पुरुष प्रधान क्षेत्र म्हणूज पाहिलं जातं मात्र या क्षेत्रात मागच्या 9 वर्ष्यापासून आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण करण्याचे धाडस पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांनी केले म्हनत खासदार प्रीतम मुंडे यांनी पत्रकार  नाईकवाडे यांचे कौतुक ही केले.

सुकेशनी नाईकवाडे यांनी समाजातिल विविध घटकातील , स्तरातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने करत असल्या बाबद हा सन्मान करण्यात आला आहे

पत्रकार सुकेशनी नाईकवाडे यांचे जिल्हाभारतातून त्यांचे कौतुक केले जात आहे तर त्यांना सर्व स्थरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

या कार्यक्रमात जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, बीड जिल्ह्या शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे ,नीता अंधारे मुख्य अधिकारी नगर परिषद बीड,उप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सह विविध क्षेत्रातील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!