MB NEWS:वीरशैव सामुदायिक विवाह सोहळा: कार्यकारिणी जाहीर

वीरशैव सामुदायिक विवाह सोहळा: कार्यकारिणी जाहीर 



 परळी ,वीरशैव समाज परळीच्या वतीने 7 जून 2023  रोजी येथील श्री वैद्यनाथ मंदिर जवळील हालगे गार्डन मध्ये वीरशैव  समाजाच्या  पोटजातीतील वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळ्या चे आयोजन करण्यात येणार आहे ,या सोहळ्यास वधू-वरांना शुभआशीर्वाद देण्यासाठी अनेक शिवाचार्य महाराजांना आमंत्रित करण्यात येणार आहे  .



 या संदर्भात रविवार दिनांक 26 मार्च रोजी हालगे गार्डन येथे घेण्यात आलेल्या  वीरशैव समाज परळीच्या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळ्या चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला, वीरशैव सामुदायिक सोहळ्यानिमित्त एक कार्यकारणी  जाहीर करण्यात आली असून  अध्यक्षपदी महादेवअप्पा इटके यांची निवड करण्यात आली तसेच उर्वरित कार्यकारीणी  घोषित करण्यात आली, उपाध्यक्षपदी सुशील हरंगुळे योगेश हालकांचे ,सचिवपदी नितीन समशेट्टे , कोषाध्यक्षपदी शिवकुमार चौंडे कार्याध्यक्षपदी अशोक नावंदे, प्रसिद्धीप्रमुख समनवयक सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली तसेच विविध समित्या लवकरच घोषित करण्याचा निर्णय करण्यात आला. या बैठकीस समाजाचे नेते दत्ताप्पा इटके गुरुजी सोमनाथ आप्पा हालगे , विजयकुमार मेनकुदळे,  नारायण अप्पा खके,   रंगनाथअप्पा खकेगुरुजी,संजय स्वामी मठपती, रंगनाथअप्पा इटके गुरुजी,सुधीर फुलारी, सुभाष भिंगोरे , प्रभाकर आप्पा इटके नारायण अप्पा खके, प्रभाकर वेरूळे , श्याम बुद्रे, रमेश चौंडे, शिवकुमार केदारी, आत्मलिंग शेटे ,रवी नंदीकोल्हे, माणिकप्पा हालगे, नरेश हालगे , महात्मा हत्ते ,प्रभूअप्पा कापसे,रामलिंग राजनाळे, सुभाष भिंगोरे अ‍ॅड. नरहरी टेकाळे , आश्विन मोगरकर,नरेश पिंपळे,   सोमनाथ गोपानपाळे  ,घनचक्कर आप्पा, विकास हालगे ,प्रकाश खोत, गजानन हालगे महेश गौरशेटे,  दत्ता गोपनपाळे ,रमाकांत गुजर, कैलास रिकीबे ,सोमेश्वर  ब्याळे, ,बागल सर संजय कोरे,लिंबराज इटके,दत्ता गोपानपाळे,व कार्यकारणी चे पदाधिकारी  उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार