MB NEWS: सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

 सचिन जगताप यांच्या 'आरंभ' माहितीपटाला राज्य शासनाचा एक लाखाचा पुरस्कार

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

परळी वैजनाथ (संजय क्षिरसागर) मोशन फिल्म स्टुडिओच्या सचिन जगताप यांनी या राज्य शासनाच्या उमेद अभियानावर तयार केलेल्या महिलांची यशोगाथा असलेल्या 'आरंभ' या माहितीपटाला एक लाख रुपयांचे राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.

मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांच्या हस्ते हे पारितोषिक सचिन जगताप यांना प्रदान करण्यात आले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 100 हून अधिक लघुपट व माहितीपट शासनाकडे सादर करण्यात आले होते.  यात सोलापूरने तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले.सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि १ लाख रुपयांचा धनादेश असे या पारितोषिकाचे स्वरूप होते.


उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी या गावातील महिलांच्या स्वयंसहायता समूहाने एकत्रित येऊन सुरू केलेल्या आठवडी बाजार आणि त्यातून मिळणारे उत्पन आणि आनंद यावर आधारित हे सर्व चित्रीकरण सचिन जगताप आणि त्यांच्या टीमने करुन आरंभ माहितीपटाची निर्मिती केली आहे.


प्रतिकुल परिस्थितीत हतबल न होता आपल्या गावासाठी काही करता येईल असा विचार बेलाटी गावातील महिलांनी केला. महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि गावाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या महिलांनी बचतगटाच्या अर्थात 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ता. उत्तर सोलापूर यांच्या सहकार्याने केलेल्या कार्याची यशोगाथा या ' आरंभ' माहितीपटात दाखविण्यात आली आहे. यासाठी *निर्मिती, संकल्पना, संकलन आणि दिग्दर्शन सचिन जगताप यांचे असून व्हिडीओ चित्रीकरण सोहेल इंगळगी तर लेखन श्रुती कुलकर्णी-पात्रुडकर आणि निवेदन आवाज रसिका भट-लिमये यांचा आहे.


यासाठी उमेद-तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, ता.उत्तर सोलापूर आणि उमेद अभियानातील समस्त बेलाटी ग्रामस्थ परिवार, ता.उत्तर सोलापूर,  जि.सोलापूर यांचे विशेष सहकार्य सचिन जगताप यांना मिळाले.सोलापूरच्या सचिन जगताप यांच्या माहितीपटाला राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळाल्यामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल सचिन जगताप यांचे समाजातील सर्वस्तरांमधून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !