MB NEWS:मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईलाच करा विविध दाखले देत केली ॲड.माधव जाधव यांनी मागणी

 मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईलाच करा विविध दाखले देत केली ॲड.माधव जाधव यांनी मागणी



अंबाजोगाई(प्रतिनिधी)दि.13- विदर्भातील रिद्धपुर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली.राज्य सरकारच्या या घोषणेला आता अंबाजोगाईतुन विरोध होतांना दिसत आहे.मराठवाड्यावर राज्य सरकार आणखी किती अन्याय करणार आहे असा सवाल मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय किसान काँग्रेस तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड.माधव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केला आहे.यामध्ये त्यांनी अंबाजोगाईला का विद्यापीठ झाले पाहीजे यासाठी दाखलेही दिले आहेत.


मुकुंदराज स्वामींनी मराठी भाषेचा पहिला ग्रंथ व मराठी भाषेची पहिली ओवी विवेक सिंधू हा ग्रंथ अंबाजोगाई येथे लिहिलेला आहे.अकराव्या शतकामध्ये स्वामी मुकुंदराज यांनी अंबाजोगाई येथे समाधी घेतलेली आहे.आजही मुकुंदराज स्वामींची समाधी अंबाजोगाई येथे असून संपूर्ण महाराष्ट्रातून व देशभरातून मराठी भाषीक प्रेमी अंबाजोगाई येथे स्वामी मुकुंदराज यांच्या समाधी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली व अंबाजोगाई हे केंद्रबिंदू त्या काळामध्ये होते.त्या स्वामी रामानंदतीर्थ यांनी मराठी भाषेची पहिली शाळा अंबाजोगाई येथे सुरुवात केली व अतिशय चांगल्या पद्धतीने आजही ती शाळा नावारुपास आलेली आहे.


स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे आशिया खंडातील सर्वात मोठे व पहिले ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे आहे.राज्य शासनाने मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याबाबत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करण्याबाबत शिफारस महाराष्ट्र शासनाला केलेली आहे.असे असताना या सर्व बाबींकडे महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष करून अंबाजोगाईवर पर्यायाने मराठवाड्यावरच राज्य सरकार अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे.राज्य सरकारने अमरावती जिल्ह्यातील रिध्दपुर येथे स्थापन करणे बाबत घोषणा केलेली ही तात्काळ रद्द करून हे विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे व सर्व मराठी भाषिकांना न्याय द्यावा अशी मागणी ॲड.माधव जाधव यांनी केली आहे.

विविध साहित्य सम्मेलनातील ठराव असतानाही राज्य सरकारने मराठी विद्यापीठ हलवले 

   दरम्यान अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ व्हावे यासाठी जागतिक पातळीवर व देश पातळीवर ठराव घेण्यात आले आहेत.असे असतांनाही मराठी भाषेचे विद्यापीठ हलवले गेले आहे. अमेरिकेत सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईला होणे बाबत ठराव मंजूर केलेला होता.यासह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,मराठवाडा साहित्य संमेलन,यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह व ग्रामीण साहित्य संमेलन यामध्ये मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे होण्याबाबत ठराव मंजूर केलेले आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार