MB NEWS:पद्मश्री तालयोगी पं.सुरेश दादा तळवलकर यांना मृदंगमहर्षी पुरस्कार

 पद्मश्री तालयोगी पं.सुरेश दादा तळवलकर यांना मृदंगमहर्षी पुरस्कार प्रदान 






 परळी l वै.पं.सुभाष महाराज देशमुख गुरूजी यांच्या 14 व्या पुण्यस्मरणार्थ पद्मश्री तालयोगी पं. सुरेश दादा तळवलकर यांना 2023 चा पुरस्कार स्मृतिचिन्ह माणपञ व शाल श्रीफळ देऊन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्रातील संगित क्षेत्रातील मान्यवरांना दिला जानारा पुरस्कार या वर्षी पुरस्काराचे मानकरी जगविख्यात पद्मश्री तालयोगी पं. सुरेश दादा तळवलकर  पुणे यांना ज्ञानेश संगीत विद्यालय खामगाव व पंडित सुभाष महाराज देशमुख गुरूजींचे सर्व शिष्य परिवार यांच्या वतीने पं. सुरेश दादा तळवलकर यांना पुरस्कार देतांना  आनोज सुभाष देशमुख, मनोज सुभाष देशमुख,समाजभूषण डाॅक्टर राजारामजी मुंडे,ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,संदिपान महाराज वानखेडे,केशव महाराज जगदाळे,संदिप महाराज लोहर,संदिप महाराज काटे,गणेश महाराज ठाकुर,सर्जेराव महाराज सपकाळ,सचिन महाराज खाणेकर,विठ्ठल आबा गव्हाणे,तुकाराम पांचाळ,बळवंत पांचाळ,भरत पटाडे,माणिक महाराज गरड,,माणिक घनवट,विश्वांभर महाराज कोल्हे व हाजारो कलावंताच्या उपस्थितीत पुरस्कार बहाल करण्यात आला  पुरस्कार प्रसंगी बोलतांना तळवलकर दादा म्हणाले कि मला  वै.पं.सुभाष महाराज देशमुख गुरूजी पुरस्कार  मला दिल्याबद्दल सर्वशिष्य परिवाराचा मि आभारी आहे मला पुरस्कार मिळाला   माझ्या  गुरूंचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे माणसाच्या जिवनात प्रत्येकांनी "लय" प्रमाणे वागावे  संगित क्षेत्रात माणसाने कधीच गर्व करू नये सदैव आपल्या कलेची मनोभावे सेवा ही निष्ठेने करावी आपली कला ही दुस-याला द्यावी याने आपली कला वाढते व मि जिवनात हाजारो विद्यार्थी घडविन्याचा प्रयत्न करित आहे मृदंग किर्तन वादनामध्ये समाधी अवस्थेची ताकद आहे

 संगीत केवळ बुद्धी, शरीर आणि मनापर्यंत नाही, तर आत्म्यापर्यंत जाऊन भिडते. आपल्यातील लय महत्त्वाची ‘मी’पणा संगीतामुळे गळून पडतो. मृदंग किर्तन सेवा रुजू करतांना अनेकदा समाधी अवस्थेत तल्लीन झाल्याची अनुभूती येते. हीच आपल्या मृदंग तबला वादनाची संगीताची खरी ताकद आहे, असे मत तालयोगी पद्मश्री पं. सुरेश दादा तळवलकर   यांनी व्यक्त केले पुढे ते म्हणाले  संगीतामध्ये सातत्याने प्रयोग होतात. आपण देत असलेल्या योगदानाची पुरस्काराच्या रूपाने दखल घेतल्याने मनामध्ये कृतज्ञतेची भावना जागृत होते. या निमित्ताने आयोजित महोत्सवा मध्ये श्री. ज्ञानेश्वर चव्हाण,ख्यातनाम तबला वादक सौ.सानवी तळवलकर,यांनी सोलो वादन केले व मुर्दान    मृदंगकीर्तन या मध्ये श्री. कृष्णा साळुंखे ,श्री सुजित लोहर,श्री पार्थ भूमकर,श्री. रोहित खवले यांनी सोलो पखवाज वादन सादर केले त्यांना साथ श्री. यशवंत थिटे यांनी हार्मोनियम लहरा साथ केली। तर कार्यक्रमाचे संचालन संदिप लोहर महाराज यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार