MB NEWS:अशोक शेजुळ हल्लाप्रकरणी आ.प्रकाश सोळंकेसह तिघांवर गुन्हा दाखल

 अशोक शेजुळ हल्लाप्रकरणी आ.प्रकाश सोळंकेसह तिघांवर गुन्हा दाखल



माजलगाव- भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर मंगळवारी धुलीवंदना दिवशी अज्ञात पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉडने शाहूनगर भागात जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक शेजुळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान शेजुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके आणि रामेश्वर टवानी यांच्यासह इतर पाच ते सात जणांवर माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी सुंदरराव सोळंके टेक्स्टाईल पार्क आणि माजलगाव सहकारीभाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी सुंदरराव सोळंके टेक्स्टाईल पार्क आणि माजलगाव सहकारी साखर कारखाना प्रकरणात काही माहिती माहिती अधिकार अंतर्गत मागवलेली होती त्या अनुषंगाने त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका देखील दाखल केलेली आहे. दरम्यान हल्लेखोरांनी हल्ला करतेवेळी अशोक शेजुळ यांना 'तू लय प्रकाश सोळंकेच्या तक्रारी करतो का?' असे म्हणत हा हल्ला केला होता असे शेजुळ यांनी तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात शेजुळ यांच्या दोन्ही पायांना दोन्ही हातांना आणि कमरेत गंभीर मार लागलेला आहे. त्यावरून पोलिसांनी अशोक शेजुळ यांची फिर्याद नोंदवून घेत बुधवारी सकाळी आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके, टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष रामेश्वर टवानी यांच्यावर भादंवी 307 120 ब कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास माजलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !