MB NEWS:कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र समारंभाचे आयोजन

 कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र समारंभाचे आयोजन



*परळी वै.*

येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2017 ते 2021 या दरम्यान पदवी पुर्ण केलेल्या विद्यार्थीनी साठी पदवी प्रमाणपत्र समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि.10 ऑक्टोबर 2018 रोजी परिपत्रक जारी करुन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा च्या अंतर्गत संलग्नित महाविद्यालयास सदरील समारंभाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कोविड च्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या वतीने मध्यंतरी च्या काळात या समारंभाच्या आयोजनावर स्थगिती देण्यात आली होती. 


नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा च्या वतीने महाविद्यालयास परिपत्रक प्राप्त झाले असुन या अन्वये सदरील पदवी प्रमाणपत्र समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. तरी या महाविद्यालयातुन शैक्षणिक वर्ष 2017 ते 2021 या दरम्यान कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेत पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींनी या समारंभासाठी दिनांक 11 मार्च 2023 शनिवार रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ.एल.एस.मुंडे व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार