इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून परदेशी कुटुंबियांचे सांत्वन

 वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून परदेशी कुटुंबियांचे सांत्वन 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-येथील उपजिल्हा रुगणालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी निधन झाले. शिवसेनेचे सर्व परिचित कार्यकर्ते युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, बंधू राधेश्याम परदेशी आणि प्रकाश परदेशी यांचे ते वडील होते.आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  बीड जिल्हा संपर्कप्रमुख श्री धोंडूदादा पाटील, सह संपर्कप्रमुख श्री बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख श्री आप्पासाहेब जाधव, जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनीघरी जाऊन परदेशी परिवाराचे सांत्वन  केले बसवेश्वर कॉलनी भागातील रहिवाशी तथा उप जिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करीत आहेत धोंडूदादा पाटील यांनी परदेशी परिवाराचे सांत्वन केले यावेळी सोबत उप जिल्हाप्रमुख श्री अभयकुमार ठक्कर, युवासेना जिल्हा समन्वयक श्री अतुल दुबे, माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप उप शहरप्रमुख किशन बुंदेले, सुरेश परदेशी योगेश घेवारे शिवसैनिक दिसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!