MB NEWS:२१ कोटी रूपये निधी खर्चून होणार योजनांची कामे

 पंकजाताई मुंडे यांच्यामुळे ग्रामीण भागाला मिळणार आता नळाद्वारे पाणी!

शुक्रवारी  लोणी, कौठळीत तर शनिवारी निरपणा, बागझरी, घाटनांदुरमध्ये होणार जलजीवन मिशन कामांचा शुभारंभ


२१ कोटी रूपये निधी खर्चून होणार योजनांची कामे


खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांचीही  उपस्थिती


परळी वैजनाथ ।दिनांक०१।

शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचे भूमिपूजन येत्या ३ मार्च  रोजी तालुक्यातील लोणी व कौठळी येथे तर ४ मार्चला निरपणा, बागझरी, सोमनवाडी, घाटनांदुर येथे  होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत  आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते  हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपरोक्त सर्व गावच्या योजनांवर सुमारे २१ कोटी खर्चाची कामे होणार आहेत.


   ग्रामीण भागातील लोकांना घरोघरी नळ कनेक्शन उपलब्ध करून त्याद्वारे शुध्द पाणी देण्याची केंद्र व राज्य सरकारची योजना आहे. पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी मतदारसंघासह जिल्हयातील जवळपास सर्वच गावे या योजनेत समाविष्ट केली आहेत. येत्या ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. लोणी व  संध्याकाळी ७ वा. कौठळी येथे योजनेच्या कामांना पंकजाताई मुंडे सुरवात करणार आहेत. लोणीची योजना एक कोटी ४४ लाखाची आहे तर कौठळीची योजना सुमारे ४ कोटी ४६ लाख रूपयांची आहे. या योजनेतून  लोणी येथे विहीर, पाईपलाईन, पाण्याची टाकी, फिल्टर तर कौठळीला कासारवाडी तलावातून कौठळी गाव आणि तांडयापर्यंत १९ किमीची पाईपलाईन, ३० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, फिल्टर बसविण्यात येणार आहे. या दोन्ही गावांत प्रत्येकांना घरोघरी नळ कनेक्शन दिले जाणार आहेत, जेणेकरून त्यांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.


घाटनांदुरसह चार गावांमध्ये शनिवारी भूमिपूजन

-------------

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने घाटनांदुर येथे पंकजाताई  मुंडे यानी  ११ कोटी ७० लाख रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या अंतर्गत विहीर, पाईपलाईन, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व वितरण आदी कामे होणार आहेत. सायंकाळी ५ वा. सोमनवाडी, ५.३० वा. निरपना, ६ वा. बागझरी येथे तर रात्रौ ७ वा. घाटनांदूर येथे पाणी पुरवठा योजनांच्या कामांचे भूमिपूजन पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहेत. या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी व अंबाजोगाई भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !