इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:चैत्री वारी: श्री.संत जगमित्रनागा महाराज पायी दिंडी व पालखीचे प्रस्थान

चैत्री वारी: श्री.संत जगमित्रनागा महाराज पायी दिंडी व पालखीचे प्रस्थान


परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)

       गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेली श्री संत जगमित्रनागा यांच्या पालखीचे गुढी पाडव्याच्या दिवशी श्री संत जगमित्रनागा मंदिरातून प्रस्थान केले.

     प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी वर्षप्रतिपदा गुढीपाढवा बुधवारी (ता.२२) संत श्री. जगमित्र नागा महाराज यांचे चैत्रमास पंढरपुर वारी साठी हजारो भाविकांच्या उपस्थित दुपारी ३ वाजता पंढरपुर पायी वारीस प्रस्थान झाले. पायी पालखी दिंडीचा मार्ग परळी ते गिरवली पहिला मुक्काम, गिरवली, आकोली, ते गादवड, पळशी, उस्मानाबाद ते उंडेगाव, मोहीते वस्ती, अंजनगांव,रामनवमीला (ता.३०) मुक्कामी असेल. तर सोमवार (ता.०३) एप्रिल दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होतो.१४ एप्रिल ला परत श्री संत जगमित्रनागा मंदिरात येणार आहे.


Video news 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या