MB NEWS:पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला ; तरुण गंभीर जखमी

 पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला ; तरुण गंभीर जखमी

गेवराई तालुक्यातील पोखरी येथील घटना 


गेवराई : 

   जुने भांडण मिटविण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतच अकरा जणांनी संगणमत करुन एका तरुणाच्या डोक्यात कुर्हाड घालून लाठ्या काठ्याने जबर मारहाण केली. या घटनेत सदरील तरुण गंभीर जखमी झाला असून अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना गेवराई तालुक्यातील पोखरी येथे मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    गेवराई तालुक्यातील पोखरी येथील सर्फराज बनेमिया शेख हा चार दिवसांपूर्वी मस्जिदीत नमाज पठण करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचे गावातीलच काही तरुणाशी वाद झाला होता. यावेळी सर्फराज याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान पोलिसांनी उपचारासाठी पत्र दिल्याने तो जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. दरम्यान रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर काही मौलानाच्या उपस्थितीत मंगळवारी पोखरी येथील मस्जितमध्ये सदरील भांडण मिटवण्यासाठी मंगळवारी रात्री बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत पुन्हा मागील भांडणाची कुरापत काढून रफिक बशीर शेख, शफिक नसीर शेख, मोहिजीन शेख, जावेद इमान शेख, जाफर उस्मान शेख, आब्बास हमीद शेख, मोहिन शेकनूर शेख, सोहेल हमीद शेख, तौफिक रशीद शेख, वसीम यासीन शेख, अरमान शेख यांनी संगणमत करुन सर्फराज शेख याला लाठ्या काठ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सरताज बनेमिया शेख, बनेमिया शेख, नौशाद सलीम शेख यांना देखील मारहाण करण्यात आली असून यामध्ये सर्फराजच्या डोक्यात कुर्हाडीचा जबर घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान सर्फराज याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी गेवराई पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी असलेल्या सर्फराज याचा जवाब नोंदवला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार