MB NEWS:महिलांना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे नव्हे महिलांनी स्वाभिमानानेच जगावे - अँड शुभांगी गित्ते

 महिलांना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे नव्हे महिलांनी स्वाभिमानानेच जगावे - अँड शुभांगी गित्ते


25 वर्षात अंदाजे 4 हजार मुलींचे शिक्षण पूर्ण झाले आहे..खऱ्या अर्थाने महिला महाविद्यालयाने स्त्री सबलीकरणाचे काम केले. -संजय देशमुख 



परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)

       महिलांना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे नव्हे महिलांनी स्वाभिमानानेच जगावे,महिला दिनानिमित्त मोबाईलवर स्टेटस् ठेवण्यापेक्षा स्त्रीचा आदर करा असे प्रतिपादन अँड शुभांगी गित्ते यांनी केले.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विशाखा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अँड शुभांगी गित्ते बोलत होत्या.

             येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या विशाखा विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन बुधवारी (ता.०८) करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक अँड शुभांगी गित्ते, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, संचालीका छायाताई देशमुख, प्रा.डॉ. विद्याताई देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे उपस्थित होते. प्रारंभी विद्येची देवता माता सरस्वती व स्त्री शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना अँड शुभांगी गित्ते म्हणाल्या की, अलिकडच्या काळात कोणत्याही महत्वाच्या दिवसाला आपापल्या मोबाईलवर स्टेटस् ठेवले जातात, आज सर्वांच्या मोबाईलवर महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्टेटस ठेवण्यात आले आहेत. हे मोबाईलवर ठेवण्यापेक्षा स्त्रीचा आदर करा,म्हणजे अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, मोबाईल व इतर कारणांमुळे

नाते संबंधात दुरावा निर्माण होत चालला आहे. न्यायालयात फक्त नात्यातील भांडणेच मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. नात्यात समंजसपणा असणे आवश्यक असल्याचे मत अँड गित्ते यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना संजय देशमुख यांनी सांगितले की,

शहरात महिला महाविद्यालय सुरू करुन स्व.श्यामराव देशमुख यांनी स्त्री शिक्षणाचा सन्मान करुन प्रसार केला. श्यामराव देशमुख यांनी अठ्ठाहासाने फक्त करायचे तर महिला महाविद्यालय अशी भूमिका स्व.गोपीनाथराव मुंडेकडे यांच्या कडे महाविद्यालय सुरू करताना मांडली होती. असे प्रतिपादन संजय देशमुख यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.डॉ यल्लावाड, प्रा. फुटके प्रा.डॉ गुळभिले, यांनी मनोगते व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा.डॉ. संगिता कचरे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ वर्षा मुंडे यांनी मानले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !