MB NEWS: संपर्कासाठी आवाहन.

 परळीच्या जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे सुवर्णमहोत्सवी स्नेहमीलन




प्रतिनिधी/परळी

परळी वैजनाथ येथील जिल्हा परिषद शाळेतील 1972 ते 1974 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा (गेट-टुगेदर) जून महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने सुमारे पन्नास वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना भेटण्याचा "सुवर्ण"क्षण येणार असून शाळेप्रतीचे उत्तरदायित्व म्हणून काही शालोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस आहे. या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे एक आव्हान आहे. त्यामुळे या संदर्भातील माहिती सर्व दूर पोहोचून संपर्क करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. डॉ. प्रदीप जब्दे (मोबाईल क्रमांक 7264066225),  वैद्यनाथ गॅस एजन्सीचे संचालक श्रीपाद बुरकुले (9422241878), महाराष्ट्र बँकेतील निवृत्त व्यवस्थापक दिवाकर धोंड (8668831896), जि. प. शाळेतील निवृत्त विश्वंभर देशपांडे (9665212407) महानिर्मितीमधून निवृत्त झालेले बालासाहेब शास्त्री (मो.96658 10197), हैदराबाद बँकेतून निवृत्त झालेले अरुण जैस्वाल   (9960671990) व परळी नगर परिषदेच्या ग्रंथालयाचे निवृत्त ग्रंथपाल उत्तम सावजी (9860806581) आदींशी संपर्क करून आपली नावे व मोबाईल नंबर नोंद करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !