MB NEWS:परळीचे भूमिपुत्र न्या. किरण देशपांडे यांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती

 परळीचे भूमिपुत्र न्या. किरण देशपांडे यांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती          


 


   परळी/प्रतिनिधी - परळीचे भूमिपुत्र, कै. रंगराव (मामा) देशपांडे यांचे कनिष्ठ सुपुत्र न्या. किरण देशपांडे यांची तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी (एडीजे) पदोन्नती झाली आहे. यापूर्वी ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरपदावर पालघर येथे कार्यरत होते. नवी नियुक्तीही त्यांना पालघरमध्येच मिळाली आहे. न्या. किरण देशपांडे यांनी पूर्वी पुणे, नागपूर, दिंडोरी, नागभिड (जि. चंद्रपूर), पाटण, औसा येथील न्यायालयात न्यायदानाची सेवा बजावली आहे. न्या. किरण देशपांडे हे परळीतील गणेशपार भागात असलेल्या देशपांडे गल्लीतील मूळ रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण वैद्यनाथ विद्यालयात तर पदवीपर्यंतचे शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झाले आहे. विधि शाखेचे शिक्षण आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले आहे. माजी नगरसेवक तथा वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आर. आर. देशपांडे यांचे न्या. किरण देशपांडे हे कनिष्ठ बंधू आहेत. त्यांचे पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !