MB NEWS:छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के

 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे - प्रशांत मस्के





परळी प्रतिनिधी


छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून समोर आणने गरजेचे असल्याचे प्रतिपादन फुले आंबेडकरी अभ्यासक प्रशांत मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परळी येथील  लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि १२ मार्च रोजी आयोजित साप्ताहिक बैठकीत केले. उदघाटक ए.तू. कराड हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड हे होते. या प्रसंगी प्रा. डॉ सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय नाट्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, लोकमत समाचार चे प्रतिनिधी सय्यद अफसर, पत्रकार नितीन ढाकणे, संभाजी ब्रिगेड चे जिल्यासचिव सेवाकराम जाधव, न. प. चे अग्निशामक दलाचे दिनेश पवार आणि युवा नेते अनंत इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.फुले -आंबेडकरी दृष्टिकोन आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र चित्रण या विषयावर प्रशांत मस्के पुढे म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त बहुजन समाजाचे प्रेरणा स्रोत असल्याचे महात्मा फुलेंनी वारंवार सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा तथाकथित इतिहास कार्रांनी पेरल्यामुळे बहुजन समाजाचे प्रचंड नुकसान झाले. शिवरायांचे स्वराज्य आणणे म्हणजे  समता, स्वतंत्र आणि मित्रत्व यावर आधारित सामाजिक व्यवस्थेचे पुनर्निर्माण होय. यावेळी समाजातील बुद्धिजीवी प्रदीप चव्हाण, प्रा. नरेश काळे, नर्सिंग गायकवाड, ऍड रायभोळे, महेश मुंडे, ओम शिंदे, विकास वाघमारे, नवनाथ दाणे, आकाश देवरे, पत्रकार अमोल सुरवसे, बाबा शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार कपिल चींडालिया यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !