MB NEWS:शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेस निवेदनाद्वारे मागणी

 छत्रपती शिवाजी महाराज व उद्यानातील भगवान श्री शंकराच्या मुर्तीची रंगरंगोटी करा-अभयकुमार ठक्कर



शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेस निवेदनाद्वारे मागणी


परळी/प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे 10 मार्च रोजी उत्साहात साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयास अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी जनता उपस्थित राहते. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांची अश्वारूढ मुर्ती स्वच्छ करून त्याची रंगरंगोटी करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी केली आहे.

या अनुषंगाने मुख्याधिकारी नगर परिषद परळी यांना शिवसेनेच्या वतीने एक निवेदन देवून लवकरच होत असलेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाची स्वच्छता करावी, त्याची रंगरंगोटी करावी तसेच जयंतीच्या निमित्ताने पुतळयावर विद्युत रोषणाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच जिजामाता उद्यानात असलेल्या भव्य भगवान शंकराच्या मुर्तीची रंगरंगोटी करावी अशी मागणी प्रस्तुत निवेदनात करण्यात आली आहे.शिवजयंती निमित्त मोठया प्रमाणात शिवप्रेमी नागरिक शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात.अशावेळी पुतळयाची स्वच्छता आवश्यक असून न.प.प्रशासनाने वेळीच ही मोहीम हाती घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन न.प.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे यांनी स्वीकारले. निवेदन देताना युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे जेष्ठ नेते सतिशअण्णा जगताप, शिवसेनेचे शहर संघटक संजय कुकडे, युवा सेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, सुधाकर बारसकार यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !