MB NEWS:दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा

 दीनदयाळ बँकेला  4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा  नफा


दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती


अंबाजोगाई - "विश्वास, विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीनुसार कार्यरत असलेली दीनदयाळ नागरी सहकारी बँक मराठवाड्याच्या सहकार क्षेत्रात मागील काही वर्षांत नांवारूपास आली आहे. आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारी बँक म्हणून ही आज दीनदयाळ बँकेकडे पाहिले जाते. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदु मानून समाजाच्या सर्वच क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या संपन्नता आणण्यासाठी दीनदयाळ बँक कटीबध्द आहे. आर्थिक क्षेत्रात आश्वासक व दमदार पाऊले टाकणा-या दीनदयाळ बँकेला 31 मार्च 2023 अखेर 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा करपूर्व नफा झाला असल्याची माहिती दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष एड. मकरंद पत्की व उपाध्यक्ष एड. राजेश्वर देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
  

दीनदयाळ बँकेची 31 मार्च 2023 (आर्थिक वर्ष 2022 - 2023) अखेर आर्थिक वर्षासाठीचे अलेखापरीक्षीत आर्थिक परिणाम सांख्यिकीय माहिती पुढीलप्रमाणे आहे (कंसातील सर्व नमुद आकडे हे कोटीत आहेत.) एकूण संकलित ठेवी (468.45), एकूण वितरीत कर्जे (292.11), एकूण गुंतवणुक (181.35), भागभांडवल (14.69), एकूण गंगाजळी (31.89), निव्वळ अनुत्पादक कर्जे (नेट एनपीए) चे प्रमाण 4.38 टक्के एवढे आहे., निव्वळ मालमत्ता (33.09), बँकेकडे (543.03) एवढे खेळते भांडवल आहे. बँकेने एकूण (760.56) एवढा व्यवसाय केला आहे. तर बँकेस तब्बल 4 कोटी 6 लाख इतका करपूर्व नफा झाला आहे. बँकेस संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे कार्यक्षेत्र आहे. तसेच बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 17 एवढ्या शाखा कार्यरत असून अंबाजोगाई येथे बँकेचे मुख्य कार्यालय स्वत:च्या मालकीच्या भव्य इमारती मध्ये कार्यरत आहे. बँकेच्या वतीने प्रतिवर्षी युगपुरूष स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. मागील 21 वर्षांपासून राज्यातील व राज्याबाहेरील अनेक नामवंतांनी आपल्या अमोघ वाणीने अंबाजोगाईकरांना, ज्ञान, अध्यात्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक मेजवानी दिलेली आहे. वृक्षारोपण तसेच पाणी टंचाईच्या काळात बँकेचे आधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बंधारा बांधला. मुक्या जनावरांसाठी बँकेच्या वतीने पाणपोईची सुविधा करण्यात आलेली होती. मागील काही वर्षांत बँकेच्या मुख्यालयास सुप्रसिद्ध समाजसेवक, आर्थिक व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार, शिक्षण तज्ज्ञ, सिने व नाट्य कलावंत, लेखक, व्याख्याते, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती, आर. बी. आय. चे वरीष्ठ अधिकारी या मान्यवरांनी वेळोवेळी बँकेस भेटी देवून आपले अभिप्राय नोंदविले आहेत. कोविडच्या काळात सर्व ग्राहकांना दर्जेदार व तत्पर बँकिंग सेवा दिल्याबद्दल ग्राहकांच्या वतीने बँकेस वेळोवेळी लेखी प्रशंसा व गौरवपत्र प्राप्त झालेले आहेत. तसेच यावर्षी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तो म्हणजे बँकेच्या सर्वांगिण कार्याची दखल घेऊन सलग दुसऱ्या वर्षी 400 ते 500 कोटी रूपयांच्या ठेवी जमविलेल्या गटात दीनदयाळ बँकेस "बँको ब्ल्यू रिबन " या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.  बँकेने नेहमीच सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा विश्वास संपादन केला आहे. तत्पर व दर्जेदार बँकींग सेवा, सुविधा उपलब्ध करून देत दीनदयाळ बँकेने सहकार क्षेत्रात "बिना संस्कार, नही सहकार" हा संस्कार जोपासला आहे. एक परिवार म्हणून काम करताना "विश्वास, विकास आणि विनम्रता " हे ब्रीद घेऊन आश्वासक प्रगती साधली आहे. सध्या बँकेच्या मराठवाड्यात अंबाजोगाई, माजलगाव, परळी वैजेनाथ., पालम, परळी रोड, नांदेड, उदगीर, लातूर, देगलूर, परतूर, धारूर, नायगांव बाजार, परभणी, औरंगाबाद, अहमदपूर, जालना बीड या ठिकाणी शाखा असून सुरूवाती पासूनच सामाजिक बांधिलकी मानून ही बँक आर्थिक क्षेत्रात कार्यरत आहे. संपूर्ण संगणकीकृत सेवा बँक पुरविते, रूपे ए.टी.एम. ची तथा युपीआयची सेवा ही उपलब्ध आहे. बँकेच्या ए.टी.एम. मशीन मध्ये इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे ए.टी.एम. कार्ड वापरता येतात. बँकेच्या सर्वांगीण विकासात बँकेच्या संचालिका तथा महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री सौ. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पालवे) यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तर संचालक रा.गो. धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ इंजि. बिपीन क्षीरसागर, प्राचार्य किसन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ. विवेक दंडे, अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे तसेच आर.बी.आय., सहकार खात्याचे आयुक्त, तथा निबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक तसेच बँकेचे सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, हितचिंतक आदींचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याची माहिती दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष एण्ड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष एड. राजेश्वर देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दीनदयाळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर म्हणाले की, 31 मार्च 2023 अखेर प्रत्येक बँकरला उत्कंठा असते ती अंतिम आर्थिक निकालाची वर्ष आलं तसं जात असतं. परंतू, वर्षभरात केलेल्या प्रयत्नांचे जणू उत्तरच मिळावे. तो आनंद, ते समाधान आणि नव्या आर्थिक वर्षाची नांदी, अशा संमिश्र भावनांची गर्दी मनात होते. पण, या भावनाच मनाला निश्चितच उभारी देऊन जातात. मार्च - 2020 पासून मार्च - 20211:02 पर्यंतचा कालावधी सर्वार्थाने बिकट होता, अचानक आलेली टाळेबंदी व त्यामुळे नफा तोटा पत्रकावर झालेला परिणाम, आपण सर्वजण हे जाणताच, त्यातही यावर्षी प्रामुख्याने ठराविक महिन्यांचा कार्यकाल, तशातच अनेक अडचणी, कर्मचाऱ्यांचे आजारपण, हे सर्व असताना ही "प्रयत्नांती परमेश्वर" या उक्तीची अनुभूती यावी व "टीम- वर्क "काय असते त्याचे उत्तर मिळावे. वैशिष्ट्ये म्हणजे कोविड 19 काळानंतर बँकेने केलेला परफॉर्मन्स व त्यासाठी कमी महिन्यांचा मिळालेला कालावधी. तसेच मा. संचालक मंडळाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचे टीमवर्क, संस्थेविषयीचे प्रेम व निष्ठा. खातेदारांचा उत्साह, सभासदांचे योगदान आहे. यामुळेच की काय या मंदीच्या कालावधीत ही बँकेने चांगला परफॉर्मन्स केला आहे. अर्थातच हे सर्व सांगण्यामागचे प्रयोजन अभिनंदन करावे हेच आहे. या सर्व अडचणींतून मार्ग काढत आमचे सहकारी, शाखाधिकारी ते सर्व शिपाई व मुख्यालयातील विभागप्रमुख व सहकारी यांचे सामुहिक प्रयास, योगदान हे ह्या आर्थिक निकालाचे मानकरी आहेत. हे येथे निश्चितच उल्लेखनीय होय. चरितार्थ चालविण्यासाठी काम करावेच लागते, संस्थेचा उत्कर्ष हे उद्दिष्ट समोर ठेवून प्रयत्न सुरू आहेत. 




Video news 




Advertise 


Video news 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?