इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:महिलांना सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50% च्या सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा असे केले आवाहन

 जिल्हाधिकारी  मुधोळ- मुंडे यांचा एसटी बस द्वारे प्रवास 


महिलांना सर्व प्रकारचे बसेस मध्ये 50% च्या सवलतीच्या दराचा लाभ घ्यावा असे केले आवाहन


बीड, दि.25:- 'महाराष्ट्र शासनाने ज्यांचे वय 75 पेक्षा जास्त आहे अशा सर्व नागरिकांना एसटी बसेस मध्ये मोफत प्रवास सवलत शासनाने दिलेली आहे. तसेच महिलांना सर्व प्रकारचे एस टी बसेस (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस सेवा) मध्ये 50% च्या सवलतीच्या दरामध्ये सूट दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या उपयोग घ्यावा . आता उन्हाळ्याच्या सुट्टी आहे मुलांच्या सुट्टी आहे कुठेतरी बाहेर जायचे असते, मुलांना पण इच्छा असते, की बाहेर जावं शासनाचे ही सवलत दिली आहे त्याचा सर्व महिलांनी उपयोग व लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे यांनी केले .


ग्रामीण महिलांच्या सोयीच्या दृष्टीने एसटी बसेस ची व्यवस्था सुधारण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे सांगून त्या म्हणाल्या, आज खूप वर्षानंतर मी बसमधून प्रवास करते आहे. आता प्रशासकीय सेवेत असल्याने व कामाचा व्याप असल्याने बसचा प्रवास कमी झाला आहे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.


एसटी बस सेवेला ऊर्जा देण्यासाठी अनौपचारिक सहलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे यांनी प्रयत्न केला आहे यासाठी आज बीड बस स्थानक येथून चार वाजता एसटी बस द्वारे प्रवास करून नायगाव येथे जाण्यासाठी त्यांचे प्रयाण झाले. यावेळी त्यांचा समवेत आई व त्यांच्या दोन्ही मुली तसेच विविध शासकीय महिला अधिकारी ,एसटी महामंडळातील महिला अधिकारी -कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या पत्नी, बीड तहसीलदार यांच्या पत्नी होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या