MB NEWS:राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सौंदळे बहिण भावाचे उत्तुंग यश:सुवर्ण व रौप्यपदक पटकावले

 बेंगलुरू येथील 17 व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चि.सूर्या सचिन सौंदळे यास सूवर्णपदक तर कु.सानवी सौंदळे सह सब ज्युनिअर संघास रौप्यपदक प्राप्त

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

  ज्योतीर्लिंग वैद्यनाथाच्या परळी नगरीतील सुपुत्र चि.सूर्या सचिन सौंदळे याने बेंगलुरू येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत नॅशनल डेव्हलपमेंट (9ते11वर्षे) गटातून सुवर्णपदक मिळवले तर त्याचीच ज्येष्ठ भगिणी कु.सानवी सौंदळे हीने ट्रिओ गटातून तसेच सब ज्युनिअर गटात यश मिळवत दोन रौप्यपदक प्राप्त केले आहेत.

  चि.सूर्या व कु.सानवी परळी-वैजनाथ येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक चेतन सौंदळे यांचे पुतणे आहेत.


   17वी राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टीक स्पर्धा गोपालन स्पोर्ट सेंटर बेंगलुरू येथे दि.29 ते 31मार्च 2023 दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या.

    या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून छत्रपती संभाजी नगरच्या 33 खेळाडूंसह देशातील विविध राज्यातून एरोबिक जिम्नॅस्टिक खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

 सदरील स्पर्धेत राष्ट्रीय डेव्हलपमेंट गटातून चि.सूर्या सौंदळे याने व्यक्तिक गटातून सुवर्णपदक प्राप्त केले तर कु.सानवी सौंदळे हीच्यासह गीत भालसिंग व सिध्दी उपरे यांनी ट्रिओ गटासह रिया नाफडे,चिरंजिता भवलकर,अनुश्री गायकवाड,या खेळाडूंनी सब ज्युनि्अर गटातील बेंगलुरू येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले आहे.

   भारत देशाच्या विविध राज्यातील खेळाडूंसह महाराष्ट्राचा संघ नॅशनल डेव्हलपमेंट ग्रुप,

    सब ज्युनिअर,ज्युनिअर,

सिनीअर,अशा चार वयोगटात पुरूष एकेरी,महिला एकेरी,मिश्र दुहेरी,तिहेरी समुह व एरो डान्स या सादरीकरण प्रकारात खेळाडू सहभागी झाले होते.

  राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सर्वाधिक पारितोषिक मिळविले आहेत त्याबद्दल महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय चषक मिळविण्याचा मान मिळाला.

  महाराष्ट्राच्या संघासाठी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी,सचिव मकरंद जोशी,छ.संभाजी नगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड.संकर्षण जोशी,उपाध्यक्ष रणजीत पवार,सचिव तथा प्रशिक्षक  हर्षल मोगरे,सर्वेश भाले,सागर कुलकर्णी,विशाल देशपांडे,अमेय जोशी,संदीप गायकवाड,राहुल तांदळे,रोहित रोंघे,राहुल श्रीरामवार,मनीष थट्टेकर, तसेच संघ व्यवस्थापक दिपाली बजाज,विवेक देशपांंडे व तनुजा गाढवे यांचे मौलिक मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले.

  सूर्या-सानवी बंधू-भगिणीसह महाराष्ट्रातील खेळाडूंनी जिम्नॅस्टिक सारख्या खेळात मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन तसेच आंतर राष्ट्रीय स्पर्धेच्या यशासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.









Advertise 




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !