इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजन समाजासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वचा पुरस्कार केला-- प्रा डी जे वाघमारे

 भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजन समाजासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वचा पुरस्कार केला-- प्रा डी जे वाघमारे




 परळी, प्रतिनिधी---जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये, इतिहास संशोधक,कायदेपंडीत, समाजसुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला.यावेळी भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहूजन समाजासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वचा पुरस्कार केला असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे. व्हि. जगतकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्याचे अभ्यासक प्रमुख वक्ते , प्रा डी जे वाघमारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य , प्रा.हरिष मुंडे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. राजू गोरे, प्रर्यवेशक प्रा. मंगला पेकामवार यांची उपस्थिती होती. कार्यकर्माचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ अर्चना चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर थोडक्यात आढावा घेतला. उपप्राचार्य ,प्रा हरीश मुंडे यांनी प्रमुख पाहुणे प्रा डी जे वाघमारे यांचा परिचय करून दिला. प्रमुख वक्ते प्रा डी जे वाघमारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर सखोल अभ्यासपुर्ण मांडणी केली. त्यात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 152 देशात साजरी केली जाते. आसे सांगून डॉ आंबेडकरांनी आपल्या विविध ग्रंथसंपदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने शैक्षणिक प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न चालविलेला होता. विद्यार्थी वर्गासाठी , प्राध्यापक, संशोधनाकरीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. ‘विद्यार्थ्यांनो जागृत व्हा.’ या लेखात त्यांनी शिक्षणाच्या काळातील शिक्षणाचे महत्त्व विशद केले असून विद्यार्थी जीवनात विद्यार्थी आपले कर्तव्य व जबाबदारी कशी पार पाडतात यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून असते. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता असे सांगून  माणगाव परीषद, चवदार तळे सत्याग्रह, अश्यस्पृता , जातियता नष्ट , वंचित, उपेक्षित स्त्रियांच्या उन्नतीसाठी, तसेच महिला कामगार, गरोदर महिला, बालकामगार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले   आहेत. कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ जे व्हि जगतकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संशोधनपुर्ण होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राध्यापकाबाबतचे विचार व्यक्त करताना प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आपला विषय सोप्या पद्धतीने सांगावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच प्राध्यापकांचे संशोधनपर लिखाण उत्कृष्ट असावे असे मत याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अर्चना चव्हाण तर आभार स्टाफ सेक्रेटरी, प्रा. राजू गोरे यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या