MB NEWS:सर्वांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*

 सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण




● सरत्या आर्थिक वर्षात 76 लाख 47 हजारांचा नफा ●



*सर्वांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*


परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.


शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि.दा. सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केलेला आहे. शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात ठरवलेली सर्वच उद्दीष्टे पुर्ण केली आहेत.पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात 108 कोटी 57लाख रुपयांची अर्थिक उलाढाल केली आहे.40 कोटी 76 लाख रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले असुन ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावरच ही वाटचाल आहे असा विश्‍वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. 

   सन 2022-23 या अर्थिक वर्षाचा ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2023 अखेर संस्थेची अर्थिक स्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी 40 कोटी 76लाख , भाग भांडवल 69 लाख 47 हजार,राखीव निधी 4 कोटी 19 लाख,कर्ज 32 कोटी 58 लाख ,गुंतवणूक 13 कोटी 13 लाख , निव्वळ नफा 76 लाख 47हजार, खेळते भांडवल 48 कोटी 16 लाख तर सीडी रेशीम 66% इतका आहे.

        पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे.  पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रंगनाथ सावजी, रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर वाटचाल सुरु आहे. संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी, व सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्या प्रयत्नातून व सभासद, ग्राहक,कर्जदार,  ठेवीदार यांच्या विश्वासावर पतसंस्थेतील उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला