MB NEWS:ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर- जिल्हाधिकारी

                                                                     ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर- जिल्हाधिकारी



बीड (जि. मा. का.)

अंतिम मतदार यादी दि. 9 मार्च 2023 रोजी प्रसिध्द झालेल्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या रिक्त जागांसाठी तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबी विचारात घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र. 19756/2021 च्या प्रक्रिये शासनाने अहवाल सादर केला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करुन, दि. 9 मार्च 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झालेल्या ग्रामपंचायतमधील रिक्त जागांचा (सदस्य/ थेट सरपंच) पोट निवडणूक कार्यक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.

 निवडणूक आयोग, महाराष्ट्र मुंबई यांचे संदर्भिय पत्रान्वये निधन, राजिनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/ थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्या अनुषंगाने आयोगाच्या दि. 20 फेब्रुवारी 2023 च्या आदेशान्वये निधन, राजिनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्यांच्या जागा तसेच सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 42, दि. 26 ऑगस्ट 2022 च्या कलम 7 नुसार थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणूका घेण्यासाठी दि. 9 मार्च 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 20 जुलै 2022 रोजी सुनावणीत मा. राज्य निवडणूक आयोगाने यापुढील निवडणूकांमध्ये समर्पित मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेउुन पुढील निवडणूका घेण्याबाबत आदेश दिले आहेत.

समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा निश्चित करण्यासाठी अहवालामध्ये टक्केवारीची शिफारस केलेली आहे. समर्पित आयोगाच्या अहवालानुसार सदस्यांच्या जागा रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीला नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या टक्केवारीची शिफारस करण्यात आली आहे किंवा कसे याची खतरजमा जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर करण्याबाबत मा. आयोगाच्या दि. 20 फेब्रुवारी 2023 च्या पत्रान्वये कळविले होते. समर्पित आयोगाच्या शिफारशी विचारात घेता, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागा अतिरिक्त ठरत असल्यास त्या अनारक्षित करुन सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित ठेवून सोडत काढण्यासाठी आयोगाच्या दि. 6 एप्रिल 2023 च्या आदेशानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिलेला आहे.

परिशिष्टानुसार ग्रामपंचायतीसाठी व वेळापत्रकानुसार पोटनिवडणुका घेण्यात याव्यात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 11 (3) मधील तरतुतीनुसार ज्या ग्रामपंचायतची मुदत समाप्त होण्यास  6 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे व अशा कालावधीत पद रिक्त होणार आहे अशा रिक्त पदांचा समावेश करण्यात येऊ नये.

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. आयोगाचे आचारसंहितेबाबतचे 14 ऑक्टेाबर 2016 चे एकत्रित आदेशानुसार त्या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा, मंत्री, खासदार, आमदार व सबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

दिनांक 6.9.2017 चे अतिरिक्त आदेश व दिनांक 17 डिसेंबर 2020 चे पत्र.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावी. सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 4 दिनांक 20 जानेवारी 2022 अन्वये  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10  -1 क नुसार आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमा नुसार नामनिर्देशनपत्रासोबत वैधता समितीकडे अर्ज सादर केल्याचा पुरावा आणि ती निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांक पासून 12 महिन्याच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील उमेदवाराने  असे हमीपत्र सादर करण्याची मुभाचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10- 1 अ (1) नुसार राखीव जागेसाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नाम निर्देशनपर पत्राबरोबर सक्षम प्राधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

निवडणूक कार्यक्रमांनुसार मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5:30 अशी असेल निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर, एखादा ग्रामपंचायतच्या निवडणुकी संदर्भात  न्यायालयाचे किंवा विभागीय आयुक्त अपील संदर्भात यांच्या स्तरावरून देण्यात आलेले स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास अनर्हतेच्या प्रकरणांमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यवाहीच्या बाबत देखील सूचनानुसार कार्यवाही करावी. केंद्र व राज्य शासनाकडून कोविड 19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना व दक्षता घेण्याबाबतच्या सूचना निर्बंध लागू झाल्यास माननीय आयोगाने दिनांक 17.1.2022 च्या आदेशातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. नवीनतम उपक्रम राबविण्यात संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी. ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या पूर्वतयारी आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

*******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार