MB NEWS:गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवकथेची उत्साहात सुरुवात

 गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवकथेची उत्साहात सुरुवात


परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)

          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त मंगळवारी (ता.११) पासून सोमवार (ता.१७) पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

               दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्या निमित्त मंगळवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचा प्रारंभ होत आहे. या हरिनाम सप्ताहात मंगळवारी कालीदास महाराज अवलगावकर, बुधवारी रामेश्वर महाराज गरड वांगी, गुरुवारी ज्ञानेश्वर महाराज सोनवणे तेर, शुक्रवारी अँड पांडुरंग महाराज लोमटे धाराशिव, शनिवारी विष्णू महाराज रासवे, रविवारी ज्ञानेश्वर महाराज लांब धारूर, श्रीधर नाना उत्तरेश्वर पिंपरी यांचे काल्याचे किर्तन सोमवारी १२ ते २ होणार आहे. रोज पहाटे काकडा आरती,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी अंकिता खांडगे यांची १ ते ५ शिव कथा, सायंकाळी ६ ते ७ धुप आरती होणार आहे. तर मुख्य पालखी सोहळा सोमवारी रात्री १२ वाजता श्री.पापदंडेश्वर मंदिरातून निघणार असून रात्री पालखी मार्गावर भारुडे, सकाळी गवळणी व मंगळवारी दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या पालखी सोहळ्यास व अखंड हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !