MB NEWS:क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

 ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या जयंती उत्सवांचा हा कालखंड प्रेरणादायी  --प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर


क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

बीड

महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याचा जयंती उत्सव दोन दिवसांच्या अंतराने येत असल्याने हा कालखंड मोठा प्रेरणादायी भारावून टाकणारा आहे. दोघांचा जीवन कालावधी एकच नव्हता पण ज्योतिबा फुले यांचे कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी असल्याने त्या संघर्षाच्या काळात आंबेडकरांनी त्यांना आपल्या गुरुस्थानी मानले होते असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या समग्र जीवन या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर , जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीप जगदाळे, जिल्हा कारागृह अधिक्षक विलास भोईटे, सहायक आयुक्त (समाज कल्याण) रवींद्र शिंदे, प्राचार्य प्रदिप रोडे तसेच तुलसी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थिती होती. 

प्रा डॉ. लुलेकर म्हणाले, पारतंत्र्याच्या काळात शिक्षणाचे मुहूर्तमेढ करताना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली शाळा इतकी आदर्श होती, की त्या काळातील इंग्रज सरकारच्या सरकारी शाळांपेक्षा ज्योतिराव फुले यांनी काढलेली शाळा उत्तम असल्याने तेव्हाच्या सरकारी शाळात विद्यार्थी जाणे बंद होतील की काय अशी स्थिती झाली होती. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी आधुनिक समाजनिर्मितीमध्ये अमुल्य योगदान दिलेले आहे. स्त्री शिक्षण, बहुजन शिक्षण तसेच ज्ञाननिर्मिती या करीता महत्वाचे कार्य केलेले आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री शिंदे यांनी केले.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्मदिवस, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपुर या संस्थेमार्फत संपुर्ण महाराष्ट्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती सर्व जिल्हयात अभिनव पध्दतीने साजरी करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या निर्देशानुसार येत आहे असे ते म्हणाले.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या वर्गातील विदयार्थ्यांच्या रांगोळी,निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेवुन प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या विदयार्थ्यास शिल्ड, प्रमाणपत्र व रोख रक्कम स्वरुपात बक्षीस वितरण करण्यात आले. रांगोळी स्पर्धेमध्ये बीडकर श्रृष्टी काशिनाथ, सावरकर महाविदयालय बीड या विदयार्थीनीस प्रथम क्रमांक मिळाला तसेच साळुंके अक्षरा गजानन, सावरकर महाविदयालय बीड या विदयार्थीनीस व्दितीय क्रमांक मिळाला व चव्हाण माया सुभाष, माध्यमिक आश्रमशाळा दारावती ता.परळी जि.बीड या विदयार्थीनीस तृतीय क्रमाक मिळाला.

वर्क्तृत्व स्पर्धेमध्ये मुंडे अश्लेशा उध्दव, तुलशी इंग्लिश स्कूल बीड या विदयार्थीनीस प्रथम क्रमांक मिळाला तसेच साखरे श्रेयशी संतोष, संस्कार महाविदयालय बीड या विदयार्थीनीस व्दितीय क्रमांक मिळाला व डोंगरे समृध्दी रतन या विदयाथीनीस तृतीय क्रमांक मिळाला. निबंध स्पर्धेमध्ये वारे माधुरी शिवाजी, आर.बी. अट्टल महाविदयालय गेवराई ता.गेवराई जि.बीड या विदयार्थीनीस प्रथम क्रमांक मिळाला तसेच कराड अश्विनी नामदेव या विदयार्थीनीस व्दितीय क्रमांम मिळाला व धन्वे क्षितीज बाळू या विदयार्थास तृतीय क्रमांक मिळाला. सर्व प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या विदयार्थ्यास शिल्ड, प्रमाणपत्र व रोख रक्कम स्वरुपात बक्षीस वितरण करण्यात आले.

तसेच सायंकाळी 6.00 वाजता यशंवतराव चव्हाण नाटयगृह येथे डॉ.संजय मोहोड यांचा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांचे जिवन कार्यावर आधारीत गीतांचा (स्वर फुलोरा) संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उत्तम पाटील, अतिरिक्त धिकारी बीड, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, आर, एम शिंदे, कल्याण काका कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष, विक्रम सारुक, प्रा.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई.सुभाष साळवे, कृषी तंत्रज्ञान आत्माचे प्रकल्प संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे  यांनी केले व आभार प्रदर्शन लक्ष्मण बारगजे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !