परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
वीज पडून एक तरुण ठार तर एक जखमी
केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे वीज पडून एक २० वर्षे तरुणाचा जागीच अंत झाला असून त्याच्या सोबतचा एक मित्र जखमी झालेला आहे.
आज दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वा. केज तालुक्यातील संकेत गित्ते रा. धोत्रा ता केज आणि सुशांत विक्रम वाकळे रा केज हे दोघे युसुफवडगाव येथून सोनीजवळा मार्गे केजकडे येत असताना रस्त्यात विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. ते दोघे युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा पासून मोटार सायकल वरून जात असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यात संकेत गित्ते रा. धोत्रा ता. केज हा जागीच ठार झाला. त्याचा मित्र सुशांत विक्रम वाकळे रा. केज हा जखमी झालेला आहे.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच तहसीलदार डी सी मेंडके यांनी या नैसर्गिक आपत्तीची माहिती वरिष्ठांना कळविली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा