इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:जोशीज् क्रिकेट अकॅडमी चा राम मस्के जिल्हास्तरीय निवड सामने खेळण्यासाठी कोल्हापूरला रवाना

 जोशीज् क्रिकेट अकॅडमी चा राम मस्के जिल्हास्तरीय निवड सामने खेळण्यासाठी कोल्हापूरला रवाना


परळी (प्रतिनिधी)...


    महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत 10 एप्रिल पासून होत असलेल्या फ गटात असलेल्या बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन 19 वर्षीय संघात परळी येथील व्यंकट जोशी सर संचलित तथा मराठवाडा पातळीवर नावलौकिक असणाऱ्या जोशीज क्रिकेट अकॅडमीचा राम संजय मस्के याची निवड झाली असून सामने खेळण्यासाठी 10 एप्रिल रोजी कोल्हापूरकडे रवाना झाला.


   एकूण 48 संघाचा सहभाग असलेल्या 2 दिवसीय लीग सामन्यात फ गटात असलेल्या बीड संघास डेक्कन जिमखाना,सिधुदुर्ग,पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन,झोरास्ट्रेन आणि सि डी ए संघांचे आवाहन असणार आहे. राम मस्के यास सहकारी म्हणून सचिन संजय धस यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. सध्या सचिन धस हा एक राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी खेळाडू असून त्याला येणाऱ्या 2024-U-19 वर्ल्ड कप चा दावेदार मानला जातो. राम मस्के गेली 5 वर्षांपासून परळीतील नावाजलेल्या जोशीज क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेटचे धडे गिरवतो. याशिवाय अकॅडमी कडून खेळताना राम विकेट कीपर बॅट्समन असून कीपिंग मध्ये 25 कॉट बिहाईंड-44 स्टॅम्पिंग,40 असिस्टंट रन आऊट त्याच्या नावावर आहेत. रामने 110 सामन्यामध्ये 45.36 च्या सरासरी ने 3447 धावा असून 17 अर्धशतक तर 7 शतकीय खेळी केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!