इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:डी. वाय. एफ.आय. परळी तालुका कमिटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

 डी. वाय. एफ.आय. परळी तालुका कमिटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग


परळी / प्रतिनिधी


महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने डी वाय एफ आय परळी तालुका कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि 14 रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरसाळा नगरीतील डॉ. हेमंत कुलकर्णी, डॉ. राहुल शिंदे,डॉ. पवार, डॉ. तौर लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉ.ॲड अजय बुरांडे हेते. 


या प्रसंगी डॉ.हेमंत कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रक्तदान केल्याने नविन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते. शरीरात तयार होणाऱ्या नविन रक्तामुळे शुद्ध पेशींची संख्या देखील वाढते. पेशी यांचे काम शरिर निरोगी राखण्याचे असल्याने त्यांच्या वाढीने आपले शरिर निरोगी राहते. पेशींच्या वाढीमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. रक्तप्रवाहात वाढ झाल्याने आपल्या हृदयाच्या समस्या कमी होतात. रक्तदान करण्यात कुठल्याच प्रकारची हानी नसून उलट त्यापासून आपल्याला फायदाच होतो.गरजू रग्णांची रक्ताची निकड पुर्ण होते.असे मार्गदर्शन करताना सांगितले. अध्यक्षीय समारोपमध्ये कॉ. अजय बुरांडे यांनी डी. वाय. एफ.आय. सातत्याने असे रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते समाजाला जागृत करण्यासाठी सतत आयुष्य वेचणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या विचारांना पुढे घेऊन समाजाला जागृत करण्यासाठी काम करणे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या कामांमध्ये पुढे राहणारी ही  संघटना काम करत असते.असे समारोपामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन डी.वाय.एफ.आय.च्या वतीने रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


या रक्तदान शिबीरामध्ये ५० युनिट रक्त हे दान करण्यात आले डी.वाय.एफ.आय.च्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल परळी डी.वाय.एफ.आय.च्या वतीने आभार विजय घुगे यांनी व्यक्त केले तर सुत्रसंचालन मनोज स्वामी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या