MB NEWS:कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल

 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल


परळी वैजनाथ ता.०३....


    कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक जाहीर झाली असुन सोमवार (ता.२७) पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती, शेवटच्या दिवशी सोमवारी (ता.०३) ७६ अर्ज दाखल झाले तर एकूण १२६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बहुजन वंचित आघाडी, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) यांनीही अर्ज भरल्याने चुरस निर्माण झाली आहे.

Click:

           येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकुण १८ सदस्यांसाठी निवडणुक होणार आहे. यामध्ये सोसायटी मतदार संघातुन सर्वसाधारण ७, महिला सदस्य २, विमुक्त जाती-जमाती व भटक्या जमाती १, इतर मागासवर्ग १, ग्राम पंचायत मतदार संघातुन सर्वसाधारण २, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक १, अनुसुचित जाती जमाती १, व्यापारी मतदार संघातुन २, व हमाल व मापाडी १ अश्या एकूण १८ सदस्यांसाठी निवडणुक होणार आहे. सोमवार ता.२७ ते ३ एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत दाखल करण्यात आले. या सात दिवसात एकूण १२६ अर्ज विविध राजकीय पक्षांकडून दाखल करण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवारी (ता.०५) सकाळी ११ वाजता होणार आहे. ६ एप्रिलला वैद्य नामनिर्देशन पत्राची सुची जाहिर होणार आहे. ६ एप्रिल ते २० एप्रिल नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. २१ एप्रिल अंतिम उमेदवार, चिन्हाचे वाटप करण्यात येणार असुन प्रत्यक्ष मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे.२९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. 



Video news 




Advertise 


Video news 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !