MB NEWS:कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी





परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

           शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

                    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्ववंदनीय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला, डॉ. आंबेडकर हे दिन,दलित, वंचित, शोषितांचा आवाज होते. तर प्राचार्य डॉ. मुंडे यांनी बोलताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व अष्टपैलू होते, ते अर्थतज्ज्ञ,जलतज्ज्ञ, मुकनायक होते. तर प्रा.प्रविण फुटके यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज भारत विश्वगुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा कोण्या ऐका जातीसाठी नव्हता तर तो लढा मानवी मुल्यांचा होता असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.फुटके यांनी तर आभार कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांनी केले. कार्यक्रमास श्री. सुहास कण्व, पांडूरंग किटाळे यांच्यासह शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार