MB NEWS:पंकजाताई गडाची पायरी तर मी पायरीतला दगड - भारजवाडीच्या सप्ताहात धनंजय मुंडेंनी दाखवला मनाचा मोठेपणा

 आसेतू-हिमालय भगवानबाबांची कीर्ती, ही कीर्ती व भक्तीची परंपरा अखंडित राहावी यासाठी सर्वांचेच योगदान महत्वाचे - धनंजय मुंडे




पंकजाताई गडाची पायरी तर मी पायरीतला दगड - भारजवाडीच्या सप्ताहात धनंजय मुंडेंनी दाखवला मनाचा मोठेपणा


*गरीब-श्रीमंतातील दरी नष्ट करणारे तेजस्वी व ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांची कीर्ती हजारो वर्षे राहील धनंजय मुंडे*


*भारजवाडी येथील नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांचे संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारे भाष्य*


पाथर्डी (दि. 11) - ऐश्वर्यसंपन्न स्वरूप आणि भक्ती शक्तीचा अनोखा संगम असलेल्या संत भगवान बाबांनी समाज सुधारणा केली, समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवला, त्यामुळेच आज मराठवाड्यातील ऊसतोड कामगार, शेतकरी-कष्टकरी कुटुंबातील मुले मोठमोठे अधिकारी बनत आहेत. ग्रामीण भागातील बहुजन समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या संत भगवानबाबांची कीर्ती कन्याकुमारी पासून ते जम्मू पर्यंत गाजली. पुढेही ही कीर्ती आणि भक्तीची परंपरा अखंडित राहावी यासाठी सर्वांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेऊन एकत्रित योगदान द्यावे, असे आवाहन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे.


संत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या परंपरेतील 89 व्या नारळी सप्ताहाची आज भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी उपस्थित लाखोंच्या भाविक सागराशी आ. धनंजय मुंडे यांनी संवाद साधला. 


Click:■ *'मिले सुर मेरा तुम्हारा' : भगवानगडाच्या पायथ्याशी महंतांच्या उपस्थितीत मुंडे बंधु भगिनींच्या मनोमिलनाचे सुखावह चित्र



स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब व आमचा संपूर्ण मुंडे परिवार भगवानगडाचा निस्सीम भक्त आहे. इथे आम्ही राजकीय नेते-पुढारी म्हणून नाही तर भक्त म्हणून येतो. भगवानगडाच्या उभारणी आणि विकासात कष्टकरी-शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या मेहनतीच्या एक-एक रुपयांपासून ते अनेकांचे योगदान आहे. गरीब आणि श्रीमंत अशी कोणतीही दरी नष्ट करून सर्वांना भक्तांच्या एकाच रांगेत बसवणारे तेजस्वी संत म्हणून आम्हाला भगवानबाबा माहीत आहेत व ते पुढच्या अनेक पिढ्यांना देखील कळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 


Click:*पंकजाताई मुंडे यांचे भारजवाडीत मिरवणूक काढून झाले अभूतपूर्व स्वागत*



व्यासपीठावर माजी मंत्री पंकजाताई मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, आ.मोनिकाताई राजळे, प्रताप काका ढाकणे यांसह अनेकांची उपस्थिती होती. 


भक्त परंपरेत मी असो किंवा पंकजाताई असो, आम्ही इथे राजकीय विरोधक म्हणून नाही तर मुंडे कुटुंबीय व गडाचे भक्त म्हणून आलोत. या पिढीत मी कुटुंबात सर्वात मोठा असल्याने कुटुंबाच्या वतीने गडासाठी जे काही करायचे, त्याची जबाबदारी मी घेतली आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 


गडाच्या भक्त परंपरेत पंकजाताई या गडाची एक पायरी तर मीही पायरीचा एक दगड आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्यातील संयमी व आपलेसे करणाऱ्या वक्तृत्वाची ओळख नव्याने करुन दिली. धनंजय मुंडे यांच्या आजच्या बोलण्यातून मनाचा मोठेपणा व वडीलकीची भावना देखील दिसून आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !