MB NEWS:बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा एकहाती विजय

 बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचा एकहाती विजय

बारामती (पुणे): बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रयत पॅनेलने सर्व १८ जागांवर एकहाती विजय मिळविला. भाजप मित्र पक्षाच्या शेतकरी विकास पॅनेलला या निवडणूकीत कोणताही करिश्मा दाखवता आला नाही.

भाजप - मित्रपक्षांचा पॅनेल राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करेल असे वाटत होते, परंतु निकालानंतर त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचेच स्पष्ट झाले. राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उरलेल्या १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. एका अपक्षाचा त्यात समावेश होता. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकहाती विजय देण्याचे आवाहन केले होते याला सभासदांनी एकहाती पाठिंबा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार