MB NEWS:मानूर ग्रामस्थांनी मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावानं केलं लेकीचं जंगी स्वागत

 विचाराची श्रेष्ठता जन्मावर नाही तर आपल्या संस्कार अन् वर्तनावर अवलंबून - पंकजाताई मुंडे





संत वामनभाऊंच्या नारळी सप्ताहात पंकजाताई मुंडे यांनी जिंकली भाविकांची मनं!





मानूर ग्रामस्थांनी मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावानं केलं लेकीचं जंगी स्वागत






मानूर ।दिनांक १३।

आपल्या धर्मामध्ये जो आपल्या अगोदर जन्म घेतो त्याला आपण श्रेष्ठ मानतो पण विचाराची श्रेष्ठता ही जन्मावर नाही तर आपल्यावर झालेले संस्कार, विचार आणि आपल्या वागण्यावर अवलंबून असते. समाजाच्या विकासाची इमारत ढासळू न देणं हे राजकारण्यांचं तर माणसांच्या आत्म्याची, संस्काराची इमारत मजबुत करणं हे अध्यात्माचं काम आहे असं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी धर्म आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी परस्परांची व्यासपीठं व्यापू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली.


  संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या परंपरेतील ९१ व्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची सांगता आज भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत मोठया थाटात आणि भक्तीमय उत्साहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन यावेळी पार पडले.


  भगवान गडाप्रमाणेच गहिनीनाथ गड हे देखील माझे श्रध्दास्थान आहे. मी नेहमीच सप्ताहाला उपस्थित रहाते. यंदा मात्र मानूरला येण्याचा कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता. मंत्री असताना मी गडाची वारी कधीही चुकवली नाही. मुंडे साहेबांनी सांगितलेली ही परंपरा काही अपवाद वगळता तेव्हापासून मी चालू ठेवलेली आहे. सत्ता असताना जर मी वेळ काढू  शकते तर सत्ता नसताना मी इथे नक्कीच येऊ शकते असं पंकजाताई म्हणाल्या. धर्म आणि राजकारणाचं व्यासपीठ परस्परांनी व्यापू नये अशी काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे, म्हणून सप्ताहात काही वेळा जावं, काही वेळेस नको अशा भूमिकेत मी असते. संत वामनभाऊंची दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून मी इथे आले. आपल्या धर्मामध्ये जो आपल्या अगोदर जन्मतो त्याला आपण श्रेष्ठ मानतो पण विचाराची श्रेष्ठता ही जन्मावर नाही तर संस्कार, विचार आणि आपल्या वर्तनावर अवलंबून असते. वामनभाऊ कडक शिस्तीचे होते. राजकारण आणि धर्माचा संबंध त्यावेळेस पासून आलेला आहे. समाजाच्या विकासाची इमारत ढासळू न देणं हे राजकारण्यांचं  आहे तर माणसांच्या आत्म्याची, संस्काराची इमारत मजबुत करणं हे अध्यात्माचं काम आहे. ज्याचे संस्कार सक्षम असतात ते लढा देऊ शकतात पण ज्याचे नसतात ते आपली नितीमत्ता रोज बदलत असतात. डोंगरदऱ्यातील माणसं वाम मार्गाला लागू नयेत म्हणून ही परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचं हे मूळयं ही किती मोठी गोष्ट आहे. मुंडे साहेबांच्या पोटी जन्म झाला हे माझं भाग्य आहे, मोठी जबाबदारी आहे, जे भाग्यानं मिळालयं ते जबाबदारीनं टिकवायचंय. संत, महतांच देखील तसंच आहे, मोठया व्यक्तीच्या गादीची परंपरा चालू ठेवणं हे जबाबदारीचं काम आहे असं त्या म्हणाल्या.


भक्त म्हणून गडाची सेवा करीत राहील

-----------

पालकमंत्री असताना तुमच्या लेकीने गडाच्या विकासा करिता २०१८ साली २५ कोटीचा निधी दिला होता, त्यातील दोन कोटीचा निधी वर्गही झाला आणि त्यातून अनेक विकासाची कामं याठिकाणी झाली. राज्य सरकारने आता त्यातलाच जो निधी गडासाठी मंजूर केला आहे तो एकरकमी द्यावा अशी अपेक्षा आहे. गडाची एक भक्त म्हणून तुमच्या प्रेम आणि विश्वासावर पुढेही अशीच सेवा करत राहील असा शब्द यावेळी बोलतांना दिला.


ग्रामस्थांकडून लेकीचं जंगी स्वागत ; मुस्लिम बांधवही सहभागी

-----------

पंकजाताई मुंडे यांचं आज ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढून स्वागत केलं. वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलांची उधळण करतांना ग्रामस्थांचा आनंद ओसंडून वाहत होता. ग्रामस्थांसोबतच मुस्लिम बांधवही त्यांच्या स्वागतासाठी मिरवणुकीत मोठया संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर पंकजाताईंनी नव्यानेच स्थापन झालेल्या श्रीराम मंदिरात विधीवत पूजा करून दर्शन घेतले तसेच महेबुबा सुबानी दर्ग्यात जाऊन चादर चढवली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !