MB NEWS:आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप

आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप



परळी वैजनाथ....."मज्जा केली, धिंगाणा केला, विविध उपक्रमात भाग घेतला आणि कळत नकळत आम्ही शिकत गेलो, आज या आठवणी आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत; परंतु शाळेने मात्र भविष्यातली मोठी शिदोरी आम्हाला दिलेली आहे", अशा भावना इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी बोलताना व्यक्त केल्या. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथील आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना आज शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. इयत्ता नववी मध्ये हे विद्यार्थी आता प्रवेश पात्र असतील. 




इयत्ता आठवीत उपस्थित असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेविषयी अगदी सहजपणे, न लाजता, न भिता इयत्ता पहिलीपासून शिकवलेल्या शिक्षकांविषयी, शाळेविषयी भावना व्यक्त केल्या याबद्दल मुलांचे कौतुक करत शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी आलेला सभाधिटपणा याचे कौतुक करत शाळेतील उपक्रमांचा भविष्यात तुम्हाला निश्चितच उपयोग होईल असे सांगितले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून सूत्रसंचालन कु राधा गुट्टे हिने केले. 

इयत्ता आठवीतील कु अमृता, अंजली, स्वाती, गायत्री, सुनीता, पृथ्वी तसेच मुलांपैकी व्यंकटेश, शिवम, अरुण, हर्षवर्धन, नवनाथ आणि धनंजय यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर तसेच शिक्षक श्री तरुडे, श्रीमती चट, इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक श्री फुटके यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शिक्षकांचे स्वागत केले, प्रास्ताविक श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले. श्री तरुडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आठवी वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्याकडून आम्ही काय शिकलो याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. आभार प्रदर्शनानंतर छोटीशा अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.




Video news 




Advertise 


Video news 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?