इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:पंकजा मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने सत्कार

 पंकजा मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने सत्कार 

परळी (प्रतिनिधी):- 

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा दीनदयाळ बँकेच्या मार्गदर्शक पंकजाताई मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ देऊन हृदय सत्कार करण्यात आला.

कुकडे परिवारासोबत पूर्वी पासूनच कौटुंबिक ऋणानुबंध आहेत  या पुढे ते वृध्दिंगत होतील. संजय कुकडे यांनी दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ.विवेक दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे असे हि पंकजाताई मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या .

या सत्कार सोहळ्यात आपले विचार मांडतांना डॉ.विवेक दंडे म्हणाले की पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ बँक प्रगती शिखरावर आहे असे सांगत सामाजिक क्षेत्रात हिरारीने भाग घेणारे संजय कुकडे यांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करणार असल्याचे डॉ.दंडे म्हणाले.

येथील यशश्री निवासस्थानी झालेल्या या कौटुंबिक सत्कार सोहळ्यास दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ.विवेक दंडे, संचालक राजाभाऊ दहिवाळ, डॉ.हरिश्चंद्र वंगे, मनोज जब्दे, संजय कुकडे, सौ.अनिता कुकडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या