MB NEWS:भीमयुग : रंगमंचावर नव्हे तर प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला नाट्याविष्कार - मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे

 भीमयुग : रंगमंचावर नव्हे तर  प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला नाट्याविष्कार - मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे




नाटक पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी 

 

परळी /प्रतिनिधी


औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र परळी वै येथे कांतीसूर्य महात्मा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त जयंती प्रतिवर्षी उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने साहित्यिक-नाटककार  रानबा गायकवाड लिखित आणि प्रख्यात सिने-नाटय दिग्दर्शक प्रा. डॉ.सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित भीमयुग नाटकाचे सादरीकरण करण्यात आले .

भीमयुग : रंगमंचावर नव्हे तर  प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला नाट्याविष्कार असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी केले. नाटक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.


         दि.१३ एप्रिल रोजी आयोजित संयुक्त जयंती कार्यक्रमात सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

सम्यक थिएटर्स निर्मित व सिने-नाटय कलावंत संघटना परळी वै. प्रस्तूत...

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचारांचा नाट्याविष्कार भीमयुगचे

लेखक-निर्माता: रानबा गायकवाड आणि दिग्दर्शक:प्रा. डॉ. सिध्दार्थ तायडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      भीमयुग नाटकात सिनेस्टार शेख गणी,महेश होनमाने,निवृत्ती खंदारे,पुजा कुरुंद, रुपाली शिरसाट,सिद्धेश्वर इंगोले, बा. सो. कांबळे, विकास वाघमारे,  मारोती कांबळे, प्रकाशसिंग तुसाम,विठ्ठलराव झिलमेवाड,विद्याधर शिरसाट, अनंत सोळंके,रतन लिंबेकर,रेखा मुंडे,सिद्धांत लांडगे ,विनायक काळे,समर्थ इंगोले,अजिंक्य कांबळे,साक्षी कांबळे, वैष्णवी कांबळे, आणि प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे महत्वपूर्ण यांनी भूमिका साकारल्या आहेत.तांत्रिक कलावंत म्हणून नवनाथ दाणे,सम्राट गायकवाड,सागर हानवते, पंचशीला गायकवाड,बंडू वाघमारे, ब्रम्हानंद कांबळे,पृथ्वी शिंदे,केशव कुकडे ,भगवान साकसमुद्रे आदींनी बाजू सांभाळली.

     यावेळी परळी महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता एच के अवचार, अधीक्षक अभियंता एस एन बुकतारे, सुरेश गर्जे, प्रशांत वंजारी, कार्यकारी अभियंता आर. एस. कांबळे, प्रदीप चव्हाण, महिंद्रा शिंदे,राहुल  वाकळे , कपिल कांबळे भागवत देवकर, शिवाजी होटकर,जयवर्धन सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी,कामगार यांच्या समवेत विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Advertise 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार