MB NEWS:बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड

 बाबासाहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला दिशा दिली - रानबा गायकवाड

परळी (प्रतिनिधी.)   महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतालाच नाही तर या जगातील प्रत्येक माणसाला दिशा देण्याचे महान कार्य केले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील इंदपवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

      इंदपवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई फुलचंद मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.  टाकणखार सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, ब्रह्मानंद कांबळे,  नवनाथ जोगदंड, भागवत मुंडे, प्रा. दशरथ रोडे, फुलचंद मुंडे, अभिमान मुंडे, ह. भ. प. भागवत मुंडे, संपत मुंडे, उत्तम रोडे, सोपान जंगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतले परंतु बाबासाहेबांनी पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला.  शैक्षणिक संस्था काढून लाखो विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग तयार केले. त्या वर्गामध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र अंगीकार करून स्वतःचा विकास करावा असे आवाहनही त्यांनी केले.

   यावेळी डॉ. टाकणखार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मध्ये केवळ दारू पिऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांची आणि प्रबोधनाची जयंती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर नवनाथ दाने यांनी यांनी बहुजन समाजाने बाबासाहेबांना स्वीकारल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही असे प्रतिपादन केले. 

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष नवनाथ रोडे, महेश रोडे, राहुल मस्के, गणपत रोडे, आदर्श जंगले, बाबासाहेब जंगले, मुंजा रोडे, बाळू बनसोडे, मल्हार बनसोडे, मिलिंद शिंदे, अनिल शिंदे, करुणा रोडे, मालनबाई रोडे, दैवताला रोडे, मिरा रोडे, अरुणा शिंदे, गवळण जंगले, लक्ष्मण रोडे, ऋषिकेश रोडे, सचिन रोडे, आकाश रोडे, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दशरथ रोडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. राजश्री नवनाथ रोडे तर आभार प्रदर्शन पप्पू रोडे यांनी केले. कार्यक्रमास गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार