शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य --जिल्हाधिकारी

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना



शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य --जिल्हाधिकारी

बीड (जि.मा.का)

डिसेंबर 2019 अन्वये राज्यतील शेतक-यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली असून या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या योजनेतर्गंत दि. 9 मे 2023 रोजी जिल्हयातील लाभार्थ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी आधार प्रमाणीकरणसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.

विशिष्ट क्रमांकासह यादी संबधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सूचना फलक, जिल्हा उपनिबंधक, कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात प्रसिध्द करण्यात येणार आहेत. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यातील शेतक-यांनी संबंधित बॅकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम अमान्य असेल, तर त्याबाबत शेतक-याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे. अशा प्राप्त होणा-या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थी शेतक-यंनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तती योजना 2019 अंतर्गत कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सामुदायिक सेवा केंद्रावर (CSC) अथवा संबधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !