MB NEWS:तब्बल 25 वर्षानंतर भरवली वर्गमित्रांनी शाळा

 ■तब्बल 25 वर्षानंतर भरवली वर्गमित्रांनी शाळा




●वैद्यनाथ विद्यालयाच्यान 97-98 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात 


परळी / प्रतिनिधी


परळी शहरातील जुन्या काळात नावाजलेली शाळा असलेल्या वैद्यनाथ विद्यालयाच्या माधव बाग शाखेतील शैक्षणिक वर्ष 1997-98 साली 10 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 25 वर्षानंतर शाळा भरवून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळेत असताना असलेले वर्ग शिक्षक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शनिवार दि 6 रोजी स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित केला.या स्नेह मिलन कार्यक्रम प्रसंगी शालेय मित्र-मैत्रिणी यांनी एकमेकांची भेट घेतली तेव्हा अनेकांच्या भावना उचंबळून आल्या.


माधव बाग येथील वैद्यनाथ विद्यालयातून शैक्षणिक वर्ष 1997-98 साली उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी ह्या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजण केले होते.शहरातील भागवत मंगल कार्यालयात अतिशय सुसज्ज आणि वाखान्याजोगे असे नियोजन माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.सकाळी 10 वाजता माधव-बाग येथील शाळेत शाळेची घंटा वाजवून शाळा भरविण्यात आली.यावेळी सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वर्ग मित्राने प्रार्थना घेतली.प्रार्थनेनंतर ज्या शिक्षकांचे निधन झाले त्या सर्व शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करून वर्ग भरविण्यात आला.यावेळी प्राथमिक वर्गात शिक्षण देणारे श्री.सरवदे सर, श्री.धसकटे सर,श्री.हरंगुळे सर तसेच माध्यमिक शिक्षक श्री.शिंदे सर,श्री.कापसे सर यांच्या सह शालेय कर्मचारी असलेले श्री कुट्टे भावजी आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिक्षकांनी तास घेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले.तदनंतर दुसरे सत्र भागवत मंगल कार्यालय येथे संपन्न झाले यावेळी शालेय जीवनातील विविध अनुभव सांगत गुरुजनांच्या संस्कारामुळे आपण कसे घडलो हे मनोगतातून सांगितले.यानंतर स्नेह भोज करून विविध खेळ खेळून सर्व वर्ग मित्रांनी 25 वर्षांनंतर पुन्हा शालेय जीवनाची मजा लुटली.शालेय शिक्षण पूर्ण करून आपल्या जिवनात शेतकरी,व्यावसायिक,उद्योजक राजकारणी,पत्रकार,नोकरदार , शिक्षक, अधिकारी अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळावात वेळेत वेळ काढून उपस्थिती होती.


■ राज्यभरातून शेकडो किमी अंतर पार करून वर्ग मित्र - मैत्रिणी स्नेह मिलन कार्यक्रमास उपस्थित

■सर्व गुरुजनांचे पुष्प उधळून, औक्षण करून स्वागत

■शालेय विद्यार्थिनी कडून बहारदार सूत्र संचलन

■स्मृती चिन्ह देऊन सर्व गुरुजनांचा यथोचित सन्मान

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !