MB NEWS:उज्ज्वल यशाची परंपरा :भेल सेकंडरी स्कूल मध्ये सातव्या वर्षी ही CBSE चा १००% निकाल

 उज्ज्वल यशाची परंपरा :भेल सेकंडरी स्कूल मध्ये सातव्या वर्षी ही CBSE चा १००% निकाल

परळी वै ( प्रतिनिधी):


 भेल सेकंडरी स्कूल ही परळी वै.  तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील नावाजलेली पहिली CBSE शाळा आहे. विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा सतत कार्यशील असते. विध्यार्थ्यांची प्रगती हीच देशाची प्रगती असते. विध्यार्थी हा देशाचा कणा असतो. तो कणा बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा बैधिक विकास महत्वाचा असतो. हा विकास अधिक प्रभावी व व्यापक स्वरूपात करण्याचे कार्य CBSE करत असते. 

        भेल स्कूलने मागील सहा वर्षाप्रमाणे या ही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.CBSE च्या परीक्षेत एकूण 83 विध्यार्थी प्रविष्ट झाले होते. ते सर्व विद्यार्थी घवघवीत यश मिळवून पास झाले. या वर्षी चि. क्षितीज संजय गित्ते याने 94.8% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, 93.2% मिळवून कु. दिपाली शाम शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर 91.8% मिळवत कु. श्रावणी मनीष देशमुख ही तृतीय क्रमांक पटकावला.

एकूण निकाल खालील प्रमाणे आहे.


90% पेक्षा जास्त 06 विध्यार्थी


80% पेक्षा जास्त 18 विध्यार्थी


70% पेक्षा जास्त 22 विध्यार्थी


60% पेक्षा जास्त 20 विध्यार्थी


60% व त्या पेक्षा कमी 17 विध्यार्थी

          निकालाच्या या प्रसंगी श्री.वसंतराव देशमुख (अध्यक्ष, शा.समिती) , श्री.विकासराव डुबे ( अध्यक्ष, शा. समन्वय समिती) श्री.विष्णुपंत कुलकर्णी (सदस्य) श्री.डॉ.सतिश रायते(सदस्य) , मा.श्री. दत्तापा ईटके (गुरुजी)  जीवनराव गडगुळ (सदस्य) , राजेश्वर देशमुख (सदस्य),  मा. श्री अमोल डूबे (सदस्य) ,  तुषार देशमुख (सदस्य) , सौ.शोभा भंडारी (सदस्य) श्री.एन.एस.राव (मुख्याध्यापक, सी.बी.एस.ई), पाटील परिक्षित ( मुख्याध्यापक ,स्टेट) श्री.एस.बोतकुलवार (उपमुख्यध्यापक) , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून पूढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


Advertise 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !