MB NEWS:30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला

 30 लाखाची बोली बोलणं आले अंगलट

अनामत रक्कमेच्या 5 हजाराला लागला  चुना


30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला


अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे ग्रामपंचायत कार्यालयाने कार्यालया लगत चार गाळे बांधलेले असून या गाळ्याचा लिलाव एप्रिल महिन्यामध्ये झाला होता. त्या लिलावामध्ये भावबंदकीच्या चढाओढीत एकाच गाळ्याला तब्बल 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. या बोलीची रक्कम आठ दिवसात भरायची होती. परंतु ती रक्कम वेळेत न भरल्यामुळे तोच लिलाव परत केला. आणि ज्या गाळ्यासाठी 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. तोच गाळा आता फक्त 26 हजाराला सुटला आहे. मात्र आता जी अनामत रक्कमेपोटी पाच हजार भरले होते. त्याला मात्र आता नगदीच चुना लागला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा 4500 लोकसंख्या असलेलं गाव. गावची मतदार संख्या 2300 च्या आसपास. गावच्या ग्रामपंचायतीने गावच्या विकासासाठी व ग्रामपंचायत ला उत्पन्न मिळावे म्हणून ग्रामपंचायत कर्यालया लगत 4 व्यापारी गाळे 10 बाय 10 आकाराचे बांधण्यात आले आहेत. हे गाळे ग्रामपंचायत ने 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने दिलेले आहेत. या गाळ्यात चहाची टपरी, झेरॉक्स, सलून अशी दुकाने आहेत. पुर्वीचा करार संपल्यामुळे ग्रामपंचायतने या चार गाळ्याचा फेर लिलाव केला होता. या लिलावामध्ये शिवाजी काळे यांनी पाच लाखापासुन तीस लाखापर्यंत बोली नेली, माजी उपसरपंच परमेश्‍वर केंद्रे यांनी 26 लाखाची बोली केली होती. गाळा क्रं.1 ला 81 हजार रूपये गाळा क्रमांक 2 ला 54 हजार रूपये, गाळा क्रं. 3 लाख 26 लाख रूपये आणि गाळा क्रमांक 4 ला 30 लाखाची बोलणी झाली होती. यासाठी प्रत्येकी 5 हजार रूपये अनामत रक्कम भरण्यात आली होती.

शिवाजी काळे यांना गाळा क्रं. 4 हा तीस लाखाला सुटला होता.मात्र याची रक्कम मुदतीत न भरल्यामुळे हा लिलाव परत घेण्यात आला. या लिलावामध्ये शिवाजी काळे यांनी पाच हजार रूपये भरले होते आता त्या रक्कमेला त्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे तीस लाखाची बोली बोलणे त्यांना चांगलेच अंगलट आले ओह. फेर लिलावामध्ये श्रीहरी काळे, अरूण मोरे, राम मोरे अपंग गटातून भाऊसाहेब कसबे या चौघा जणांना केवळ 26 हजाराच्या अनामत रक्कमेत 4 गाळे मिळाले आहेत. छोट्याशा खेड्यामध्ये ग्रामपंचायतच्या गाळ्याचा लिलाव तीस लाखाचा झाल्यामुळे याची चर्चा महाराष्ट्राभर गाजली परंतु ही बोली भावबंदकीच्या चढाओढीमध्ये झाल्याचे ग्रामस्थातून बोलल्या जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !