युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:पत्रकार आणि पत्रकारितेच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे गुरूवारी धरणे आंदोलन

 पत्रकार आणि पत्रकारितेच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे गुरूवारी धरणे आंदोलन



 बीड (प्रतिनीधी)...


   पत्रकारिता आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाभरात व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. तरी सर्व पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे अवाहन व्हॉईस ऑफ मीडियाकडून करण्यात येत आहे.

माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून काही मागण्या सरकारकडे करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 1) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. 2) पत्रकारितेत 5 वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. 3) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. 4) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. 5) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. 6) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. 

या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयसमोर गुरूवारी (दि.11 मे) सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत धरणे आंदोलन करणार आहे. बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे अवाहन व्हॉईस ऑफ मीडियाकडून करण्यात येत आहे.

---------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या