MB NEWS:बंजारा समाजाचे दैवत रूपसिंह महाराजांच्या भव्य मूर्तीचे थाटात अनावरण ; पंकजाताई मुंडेंच्या भाषणानं बंजारा बांधवांत नवचैतन्य

 पंकजाताई मुंडे यांचे मध्यप्रदेशात मुख्यमंत्र्यांसमवेत विविध कार्यक्रम

बंजारा समाजाचे दैवत  रूपसिंह महाराजांच्या भव्य मूर्तीचे थाटात अनावरण ; पंकजाताई मुंडेंच्या भाषणानं बंजारा बांधवांत नवचैतन्य


शिवराजसिंह चौहान यांच्या पाठिशी एकजुटीनं उभं राहण्याचं केलं आवाहन


भोपाळ ।दिनांक ११।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या सह प्रभारी   पंकजाताई मुंडे आज मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर होत्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या खास निमंत्रणावरून त्या बंजारा समाजाच्या मेळाव्यासोबतच विविध शासकीय विकास योजना व लोकार्पण कार्यक्रमांना उपस्थित होत्या. बंजारा समाज मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणानं उपस्थित समाज बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. सर्व सामान्य जनतेच्या भल्याचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पाठिशी एकजुटीनं उभं राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं.


   मंदसौर जिल्हयातील जवानपुरा, सीतामऊ व मेलखेडा या  तीनही ठिकाणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत विविध विकास योजनांचे उदघाटन व लोकार्पण पार पडले. जलसंधारण मंत्री तुलसीराम सिलावट, मंत्री हरदीप सिंग डंग यांच्यासह आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते. 


  जवानपुरा येथे राज्य सरकारच्या वतीने २ हजार ३७४ कोटी रूपयांच्या सिंचन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून २५२ गावांतील सुमारे १ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सीतामऊ येथे 'लाडली बहन' योजनेअंतर्गत महिलांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.


*पंकजाताईंनी बंजारा बोलीतील भाषणांनं जिंकली मनं*

----------------

मेलखेडा येथे बंजारा समाजाचे दैवत रूपसिंह महाराजांच्या आठ फुट भव्य मूर्तीचे अनावरण शिवराजसिंह चौहान व पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया थाटात झालं. यावेळी पंकजाताईंनी 'जय सेवालाल' म्हणत बंजारा बोलीत उपस्थितांशी संवाद साधला."म पंकजा गोपीनाथ मुंडे तमारो लाडको नेता गोपीनाथ मुंडे साहेबेर बेटी.  तमारे सोबत बोले सारू म महाराष्ट्र राज्येती आई छु. बंजारा समाज भारतीय संस्कृती व परंपरारो प्रतीक छ" असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. लोकनेते मुंडे साहेबांचं बंजारा समाज बांधवांवर विशेष प्रेम होतं.  महाराष्ट्रात पोहरादेवी तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी आपण आवर्जून येता. रामराव महाराजांचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच लाढला आहे.   हा समाज लढवय्या आणि शौर्याचा आहे.  शिवराजसिंह चौहान यांनी समाजासाठी मोठं योगदान दिलं आहे, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून त्यांनी खरं काम केलं आहे, ते पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसावेत  ही सामान्य जनतेची इच्छा आहे, त्यांच्या पाठिशी एकजुटीने व ताकदीने उभं रहा असं आवाहन त्यांनी केलं.

••••


Advertise 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !