MB NEWS:सातशे वर्षापुर्वी राजा रामदेवराय यांनी बांधले होते मंदीर

 महादेवाच्या पिंडी खाली निघाले सोन्याचे कासव !

सातशे वर्षापुर्वी राजा रामदेवराय यांनी बांधले होते मंदीर 


माजलगाव दि.६ (प्रतिनिधी ) भारतातील एकमेव आसलेले भगवान पुरुषोत्तमाचे गोदावरी नदीच्या काठावर राजा रामदेवराय यांनी उभारलेल्या मंदिराचे नविन बांधकाम करण्यासाठी भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरातील मुर्तीसमोर आसलेल्या महादेवाची पिंड काढत आसतांना पिंडीखाली सोन्याचे कासव सापडल्याचा प्रकार  माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे उघड झाले.आसुन भक्तगण मनोभावे पुजा करत आहेत.

   माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे गोदावरी नदीच्या काठावर ७०० वर्षापुर्वी राजा  रामदेवराय यांनी मंदीर बांधले होते. या पुरुषोत्तमाची आधिकमासा निमित्त एक महिनाभर जञा भरत आसते . यावेळी देशभरातुन लाखो भाविक दर्शनासाठी येत आसतात. मंदीराची होणारी पडझड येथील भक्ताच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत महाराष्ट्र   शासनाच्या वतीने मंदिर जिर्णउद्धार व ईतर कामासाठी ५४कोटी ५६ लाख विभागिय आयुक्त सुनिल केंन्द्रेकर यांच्या प्रयत्नाने निधी मिळाला त्या निधीनुसार झालेल्या टेंटर नुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आसतांना  जुलै महिन्यात अधिकमास सुरु होणार आसल्याने मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाची मुर्ती जुन्या मंदिरातुन हालवुन भाविक भक्तांना दर्शनासाठी हालवली आसता.त्याच मुर्ती समोर आसलेल्या महादेवाची पिंड ही हालवली आसता.दि.५रोजी त्या पिंडिखाली सोन्याचे कासव आढळुन आले. सदरील कासव सातशे वर्षापुर्वी पिंडी खाली ठेवले आसल्याचे विश्वस्त विजय गोळेकर यांनी सांगितले 

    सदरील सोन्याचे कासव मंदीराच्या विश्वस्तांनी ताब्यात घेतले आसता. सदरील कासव जवळपास १ तोळा आसल्याचे सांगण्यात आले.

   या मुळे भाविक भक्तांनी त्या कासवाची मनेभाव पुजा केली.नविन मंदिर उभारणी नंतर ते पुन्हा पुर्ववत पिंडीत आहे.त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार