MB NEWS:लिंबुटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तोडफोड प्रकरणी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

 लिंबुटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तोडफोड प्रकरणी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल


परळी वैजनाथ, प्रतिनिधी
      तालुक्यातील लिंबूटा येथे गावकऱ्यांनी उभ्या केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संतप्त भावना व्यक्त होत होत्या. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             याप्रकरणी हनुमंत दत्तात्रय दिवटे  रा लिंबुटा पो स्टे पांगरी कॅम्प ता - परळी यांनी फिर्याद दाखल केली.या फिर्यादीत म्हटले आहे की,सुमारे आठ वर्षापुर्वी लिंबुटा गावातील गावक-यांच्या वतीने परळी ते बीड जानार्या रोडचे डाव्या बाजुस गावाचे कमानी जवळ एक सिमेंटची टाकी बसऊन त्यावर भगवा ध्वज लावुन चौक तयार करून त्या चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले होते. दि 19/05/2023 सकाळी 06.00 वा सुमारास फिर्यादी व गावातील संदीप दिवटे, नारायन दिवटे, माऊली चव्हाण, सचिन कराड, आदिनाथ दोडके असे लोकांनी चौकात जावुन पाहीले असता सदर चौकाची कोणीतरी अज्ञात लोकांनी मोडतोड करून पाडून नुकसान केल्याचे दिसुन आले.चौक पाडून नुकसान करून धार्मीक भावना दुखावल्या. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गु.र.नं 142/2023 कलम 295(अ), 427 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !