MB NEWS:परळीतील पोलीस निरीक्षकावर कारवाई

 पोलीस दलात खळबळ: आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू: परळीतील पोलीस निरीक्षकावर कारवाई 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....


     पोलीस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता थेट परळीतील एका पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी जबाबदार धरत पोलीस निरीक्षकाला सीआयडीच्या एका पथकाने आज परळीत येत ताब्यात घेतले आहे. 

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सन 2014 मध्ये  परळी पोलीसांनी अटक करुन पोलीस कोठडीत ठेवलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने गळफास घेतल्याने कोठडीतच त्याचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी जबाबदार धरत तत्कालीन एक अधिकारी व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी मयतांच्या नातेवाईकांनी केलेली होती.न्यायालयात हे प्रकरण सुरु असतांना सखोल चौकशी करण्यात आली.याप्रकरणी पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना जबाबदार धरत  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात आज एक पथक परळीत दाखल झाले.या पथकाने पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे.अंबाजोगाई सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Advertise 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार