MB NEWS:एकही दिवस मतदार संघात प्रचार नाही केला:विनय कुलकर्णींनी मारली बाजी

 एकही दिवस मतदार संघात प्रचार नाही केला:विनय कुलकर्णींनी मारली बाजी


धारवाड  : धारवाड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी विजयी झाले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा त्यांनी पराभव केला. विशेष म्हणजे कुलकर्णी यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आल्याने त्यांनी या मतदारसंघात एकही दिवस प्रचार केला नव्हता.
           विनय कुलकर्णी यांच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. खून प्रकरणी काही महिने ते हिंडलगा कारागृहात होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक उमेदवारी अर्ज भरून देखील जिल्हा बंदीमुळे विनय कुलकर्णी यांना एक दिवसही प्रचार केला नाही. त्यांची पत्नी, परिवाराने व कार्यकर्त्यांनी प्रचार कार्य राबविले. त्यामुळे विनय कुलकर्णी हे निवडून येणार याकडे राज्याचे लक्ष होते. पण एक दिवसही प्रचार न करता विनय कुलकर्णी हे विजयी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्नाटकात काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने १२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ७२, जेडीएस २४ जागांवर आणि अपक्षांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा ११३ आहे. काँग्रेस १२० पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

Advertise 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !