इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजची यशाची परंपरा कायम

 वैद्यनाथ कॉलेजची यशाची परंपरा कायम



परळी, प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2023 मध्ये  घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज वैद्यनाथ काॕलेज ,परळीचा विज्ञान शाखेचा.92.21% टक्के व कला शाखेचा 92% व व वाणिज्य शाखेचा92.50% एम सी व्ही सी चा 92.31 निकाल लागला आहे. कला  शाखेतून अनुक्रमे प्रथम व तृतीय आणि क्रमांकाने कु.बहीरे प्रतिभा विष्णू 83.33%, कु.तिखे आरती संतोष कू.मंदे अंजली नारायण 80%,वाणिज्य शाखेतून  कु. सुरवसे मयुरी दिलीप 86%, कु. दीक्षित पायल विठ्ठल 83.50 %,चि.पुरी अजित संजय 78.50% ,तर विज्ञान शाखेतून कु.जोरवर प्राची रमेश 89.16 ,%कु.पोरवाल आरती सुरेश 87.33%, कु.रांदड आरुषी विजय 87.16% , व्होकेशनल शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून कु. दहिवडे प्रणाली अशोक 76.83 % चि.गोयल ओंकार धनराज 65 %चि.भारती सौरभ गजानन 63.83% तर इलेक्ट्रिकल्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून चि मुंडे बळीराम महादेव 67%,चि.घाडगे शनी लक्ष्मण 64%आनंदास आदित्य नरसिंग 63.83% गुण घेऊन अनुक्रमे प्रथम   द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश संपादन केलेले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयातील मुलींनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. या यशाबदल जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया, सचिव, श्री दत्ताप्पा इटके, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ जे व्हि जगतकर, उपप्राचार्य ,प्रा हरीश मुंडे, प्रयेवेशिका प्रा. मंगला पेकमवार, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा उत्तम कांदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या