MB NEWS:माजी केंद्रीय मुख्याध्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे निधन

 माजी केंद्रीय मुख्याध्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे निधन

परळी, प्रतिनिधी...

माजी केंद्रिय मुख्याद्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे वृद्धपकाळाने आज बुधवार दि.10 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वयाच्या 82 व्यावर्षी दुःखद निधन झाले.त्याच्या पार्थिव देहावर गुरुवारी सकाळी 8 वाजता कन्हेरवाडी येथील स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मिलिंद नगर व हल्ली मुक्काम प्रिया नगर येथील रहिवासी असलेलेकेंद्रीय प्राथमिक शाळेत त्यांनी केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राला सेवा दिली असुन फुले शाहु आंबेडकर चळवळीचे ते अभ्यासक तर होतेच पण चळवळीला मोठे योगदान ही दिले आहे,परळी रेल्वे स्टेशन परिसरात पुर्वी असलेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात मोठे योगदान राहिलेले माजी केंद्रीय मुख्याद्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे निधन झाले आहे.त्यांच्या जाण्याने सर्वञ शोकभावना व्यक्त होत आहे.

           दिवंगत प्रभाकर साधुजी बुक्तर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,दोन मुली सुना नातवंडें  असा मोठा परिवार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार