MB NEWS:वैद्यनाथ साखर कारखाना निवडणूक: एकूण ५० उमेदवारी अर्ज दाखल

 वैद्यनाथ साखर कारखाना निवडणूक: एकूण ५० उमेदवारी अर्ज दाखल




परळीवैजनाथ: प्रतिनिधी....
        तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकूण ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव व वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या माजी चेअरमन पंकजा गोपीनाथराव मुंडे ,श्रीमती प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे, खा.प्रितम गोपीनाथराव मुंडे, यश:श्री गोपीनाथराव मुंडे, अजय मुंडे,वाल्मिक कराड, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन फुलचंद कराड, माजी संचालक शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे आदींसह एकूण ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

           पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी दि 10 ते 16 मे दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय परळी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आज  16 मे रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती.यामध्ये एकूण ५० अर्ज दाखल झाले आहेत.

● या उमेदवारांनी दाखल केले अर्ज ....
1. व्यक्ती उत्पादक सभासदांनी निवडायचे प्रतिनिधी गटः बाबासाहेब शंकरराव शिंदे (सिरसाळा),विनायक तुकाराम गडदे (पांगरी),फुलचंद एडबा कराड (पांगरी)
राजेश हरिश्चंद्र गित्ते (नाथरा),शिवाजी शंकर गुट्टे (धर्मापुरी),सतिष तुकाराम मुंडे (नाथरा),श्रीहरी विठ्ठलराव मुंडे (पांगरी),पंकजा गोपीनाथराव मुंडे (नाथरा),अंगद गणपत मुंडे (पांगरी),सुरेश विश्वनाथ माने (सिरसाळा),बंकटराव मेघाराव कांदे(परळी),रेशीम रखमाजी कावळे (पांगरी),पांडुरंग कोंडीबा फड (परळी),
बळीराम ज्ञानोबा गडदे (पांगरी),सतिष श्रीहरी मुंडे (पांगरी),शिवाजी रामराव मोरे (धर्मापुरी),प्रभाकर वैजनाथ माने (धर्मापुरी),ज्ञानोबा भगवान मुंडे (पांगरी)
हरीभाऊ व्यंकटराव गुट्टे (परळी),सुधाकर पंढरी सिनगारे (धर्मापुरी),हरीभाऊ तात्याराव देशमुख (सिरसाळा)
अजय माणिकराव मुंडे (नाथरा),सचिन श्रीराम दरक (परळी ),ज्ञानेश्वर साहेबराव शिंदे (नाथरा ),श्रीराम गणपतराव मुंडे (पांगरी),कुंडलिक सिताराम मुंडे (पांगरी),वसंत शिवाजी राठोड (सिरसाळा),चंद्रकेतू मधुकर कराड (सिरसाळा),विनायक शंकरराव गुट्टे (धर्मापुरी ),विठ्ठल अंतराम नागरगोजे (पांगरी),
--------------------
2.महिला राखीव प्रतिनिधी
पंकजा गोपीनाथराव मुंडे,प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे
यशश्री गोपीनाथराव मुंडे, खा.डॉ प्रितम गौरव खाडे-मुंडे,संजिवनी जिवराज गुट्टे,सुमन फुलचंद कराड, सुशीला ज्ञानोबा मुसळे,गोदाबाई भगवान गित्ते
------------------
3.भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग
सुर्यकांत रामकृष्ण मुंडे,फुलचंद एडबा कराड,सतिष तुकाराम मुंडे ,राजेश हरिश्चंद्र गित्ते,विनायक तुकाराम गडदे,वाल्मिक बाबुराव कराड
----------------
4.अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी
रामकिशन भिवाजी घाडगे,मंचक दत्तात्रय घोबाळे, नारायण संभाजी पारवे,
------------------
5.इतर मागासवर्ग प्रतिनिधी (०१)
  विजयकुमार केशव माळी,केशव रंगनाथ माळी
------------------
6.सहकारी संस्था (उत्पादक, बिगर उत्पादक पणन): सत्यभामा उत्तमराव आघाव


Advertise 








     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !