,MB NEWS:अतिक्रमण मालकी हक्क परिषदेत एकमुखी निर्णय

 ■ताबा नको मालकी हक्क द्या-किसान सभेची मागणी

●लाल बावटा सर्वसामान्यांच्या पाठीशी-एड.अजय बुरांडे

अतिक्रमण मालकी हक्क परिषदेत एकमुखी निर्णय


परळी / प्रतिनिधी


"ताबा नव्हे मालकीची नक्कल हवी "या मागणीचा ठराव सहमत करून दि 5 जून रोजी परळी तहसील कार्यालया वरती मोर्चा काढण्याचा एक मुखी निर्णय

किसान सभा व शेतमजूर युनियन च्या वतीने गायरान निवासी अतिक्रमण मालकी हक्क परिषदने आयोजित केलेल्या परिषदेत घेण्यात आला.या परिषदेस माकपचे तालुका सचिव कॉ.गंगाधरराव पोटभरे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन राज्य अध्यक्ष तथा अतिक्रमण प्रश्नाचे गाढे अभ्यासक कॉ. मारोतीराव खंदारे, बीड जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष

कॉ. अॅड. अजय बुराडे,कॉ.मुरलीधर नागरगोजे,कॉ.सुदाम शिंदे, कॉ. अॅड. सय्यद याकूब आदींची प्रमुख उपस्थिती होती.


परळी तहसिलकडून सिरसाळा येथील शेकडो लोकांना अतिकमण निष्कसीत करण्याबाबत नोटीसा दिल्याने सिरसाळ्यातील समस्त अतिक्रमित घर दुकानदार भयभीत झाले आहेत. दारिद्यामुळे खाजगी प्लॅट घेता न आल्याने शासकीय जमिनीवर कुटुंबाना निवारा बांधून गेल्या ३० वर्ष्यापासून हे लोक राहत असून छोटे मोठे धंदे करुन पोट भरत आहेत.या वस्त्यांना ग्राम पंचायतकडून लाईट, नळयोजना रस्ते, नाल्या ई. नागरी सुविधा मिळत असून, सदरील अतिक्रमण धारकांचे नावे मतदार यादीत असून रेशन व्यवस्थेचा बहुतांश लोकांना लाभ मिळत आहे.  अतिक्रमण धारकापैकी शेकडो लोकांची नावे ग्राम पंचायत कार्यालयात भोगवटा रजिस्टर ला लागलेली असून, शेकडो लोकांच्या घरांचे सर्वे ग्राम पंचायतने अनेक वेळा केलेला आहे. तसेच २३१ कुटुंबाना शासनाच्या वतीने इंदिरा आवास योजने अंर्तगत १९८०-८६ दरम्यान रीतसर घरकुले बांधून दिलेली आहेत. खेदाची बाब हि आहे या घरकुलाची नोंद मालकी हक्कात केलेली नाही. याकरिता गेली बारा वर्ष लाल बावट्या जे भोगवटा धारक आहेत त्याला मालकी हक्कातघ्या व अतिककमन धारकास भोगवट्यात नोंद करा अशी मागणी करीत आहे.

याच गायरान जमिनी व गायरान जमिनीवरील घराचे अतिक्रमण नियमित करणे बाबतची परिषद किसान किसान सभा व शेतमजूर युनियन यांच्या वतीने सिरसाळा संपन्न झाली असून या परिषदेत दि 5 जून रोजी परळी तहसीलवर आंदोलनाची हाक दिलेली आहे. या परिषदेत मोठ्या संख्येने सिरसाळा येथील महिला नागरिक तरुण विद्यार्थी सहभागी होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार